How will be the result up to class VIII? ....... Read kokan Marathi News  
कोकण

इयत्ता आठवीपर्यंतचे निकाल लागणार कसे?.......वाचा

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. परिणामी पहिली ते आठवीपर्यंतच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील निकाल मूल्यमापनातील साधनतंत्राद्वारे तयार होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. शाळा पुढील सत्रात जूनमध्येच सुरू होण्याची शक्‍यता असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये 16 मार्चपासून शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील परीक्षा झाल्या नाहीत. त्या सत्राचा निकाल तयार करण्यात शिक्षकांना अडचणी येत आहेत. निकाल तयार करताना सर्व शिक्षकांना काही मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यात दुसऱ्या सत्राची परीक्षा घेऊ नये आणि आकारिक मूल्यमापनातील साधनतंत्राद्वारे केलेल्या मूल्यमापनाद्वारे या सत्राचा निकाल तयार करावा, असे म्हटले आहे. 

असा ठरणार निकाल 
आकारिक मूल्यमापनासाठी भाषा, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांसाठी किमान पाच साधनतंत्रे आणि कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी किमान तीन साधनतंत्रे वापरून गुणनोंद करावी. मिळालेल्या गुणांची टक्केवारी काढून श्रेणी देण्यात यावी. टक्केवारीसाठी प्राप्त गुण गुणिले 100 भागिले आकारिक मूल्यमापनाचे एकूण गुण असे सूत्र वापरावे, अशा सूचना आहेत. 

एक मेचा मुहूर्त हुकला 
आकारिक मूल्यमापनासाठी विषयनिहाय पुढीलप्रमाणे गुण ः पहिली व दुसरी 70, तिसरी व चौथी 60, पाचवी व सहावी 50, सातवी आणि आठवी 40. या कालावधीत शिक्षकांनी विद्यार्थी नोंदवही, गुण नोंदवही, विद्यार्थी संचिका, प्रगती पत्रक यातील नोंदणी पूर्ण कराव्यात तसेच संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये म्हणून सर्व शाळांनी निकालपत्र पुढील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलांना द्यावे, असेही श्री. आंबोकर यांनी स्पष्ट केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT