mangesh waghmare
mangesh waghmare sakal
कोकण

एकीकडे वडिलांची अंत्ययात्रा सुरू; आणि दुसरीकडे तिचा बारावीचा निकाल जाहीर

अमित गवळे

एकीकडे वडिलांची अंत्ययात्रा सुरू होती. आणि दुसरीकडे तिचा बारावीचा निकाल जाहीर झाला. एवढंच काय तर बारावीच्या परीक्षेत तिने तिच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.

पाली - एकीकडे वडिलांची अंत्ययात्रा सुरू होती. आणि दुसरीकडे तिचा बारावीचा निकाल जाहीर झाला. एवढंच काय तर बारावीच्या परीक्षेत तिने तिच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. मात्र मुलीचे हे यश पहायला वडील उपस्थित नव्हते. किंबहुना वडिलांच्या निधनाने त्या मुलीनेही तिचा निकाल पाहिला नव्हता.

सुधागड तालुक्यातील हातोंड येथील रहिवासी सम्यक क्रांती विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते व सुधागड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांचे मंगळवारी (ता. 7) रात्री अपघाती निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी (ता. 8) दुपारी काढण्यात आली. याचवेळी बारावीचा निकाल जाहीर झाला. वाघमारे यांची मुलगी विदीशा हिने पालीतील ग. बा. वडेर हायस्कुल व व. ग. ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेतून प्रथम क्रमांक मिळविला. तिला तब्बल 83.67 टक्के मिळाले. मात्र मुलीचे हे यश पाहण्यासाठी वडील हयात नव्हते. एकीकडे बारावीचा निकाल आणि दुसरीकडे वडिलांची अंत्ययात्रा अशी विलक्षण परिस्थिती पहायला मिळाली. यामुळे तिच्या शिक्षकांसह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. आपल्या मुलीने खूप शिकावे यासाठी मंगेश वाघमारे खूप प्रयत्नशील होते. नियमित ते मुलीला कॉलेजमधून न्यायला व आणायला येत असत. मात्र मुलीचे हे यश त्यांना पहायला मिळाले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT