death sakal
कोकण

इन्सुली सातजांभळ जंगलात आढळला मानवी सांगाडा

गळफास घेतल्याच्या स्थितीत; वर्षभरापूर्वीची घटना शक्य

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : येथील जुन्या झाराप-इन्सुली राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली सातजांभळ परिसरातील जंगलातील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत पुरुषाचा सांगाडा आढळून आला. जंगलात गेलेल्या काही व्यक्तींच्या हा प्रकार उघडकीस आला. हा सांगाडा जवळपास वर्षभरापूर्वीचा असल्याची शक्यता तपास करणारे सहायक पोलिस तौसिफ सय्यद यांनी व्यक्त केली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून दिलेली माहिती अशी, की इन्सुली सातजांभळ जंगल परिसरात काही व्यक्ती आज दुपारच्या सुमारास गेल्या होत्या.

तेथे त्यांना गळफास स्थितीत असलेला पुरुषाचा सांगाडा दिसून आला. याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सय्यद, पोलिस उपनिरीक्षक यशवंते, एस. एन. लोहकरे, महेश जाधव, हवालदार सावंत, जाधव यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तो सांगडा जमिनीवर पडलेला होता. त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यावरून तो पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कवटीला गळफास लावलेली दोरी होती व उर्वरित दोरी झाडावर होती. गळ्यातील दोरी व झाडावर तुटलेली दोरी यामुळे प्रथमदर्शनी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा सांगाडा जवळपास वर्षभरापूर्वीचा असल्याची शक्यता सय्यद यांनी व्यक्त केली. पोलिसांनी पंचनाम केला.

ओळख पटविण्याचे आव्हान

फक्त सांगाडा शिल्लक राहिल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. आता त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अंगावरील कपडे व बेपत्ताच्या नोंदींवरून त्याची ओळख पटवली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT