husband and wife injured in accident in fire wife dead in ratnagiri khed 
कोकण

धक्कादायक! स्वतःला पेटवून घेत बायकोने नवऱ्यालाही मारली मिठी

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : तालुक्‍यातील कुळवंडी - देऊळवाडी येथे नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन बायकोने आपल्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ती एवढ्यावर थांबली नाही तर पेटत्या अवस्थेत घराबाहेर काही अंतरावर उभ्या असलेल्या नवऱ्याला मिठी मारली. या घटनेत महिला गंभीर भाजली, नंतर तिचा मृत्यू ओढवला. पतीही भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (22) मध्यरात्री घडली असून या प्रकरणी तपास पोलीस करत आहेत. 

शिल्पा मंगेश निकम (वय 40) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून तिचा नवरा मंगेश बाळाराम निकमही जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील कुळवडी देऊळवाडी येथे सोमवारी (22) मध्यरात्री आपल्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याने महिला 99 टक्के भाजली. तिने पतीला त्याच अवस्थेत मिठी नारल्याने पती भाजला अन्‌ गोंधळ उडाला. महिलेचा अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. नवरा देखील 60 टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे. मंगेश यांच्यावर खेडमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT