Ratnagiri Crime
Ratnagiri Crime esakal
कोकण

Ratnagiri Crime : धक्कादायक! अनैतिक संबंधाचा संशय येताच पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी संशयित पत्नी शीतल पडवळ आणि तिचा कथित प्रियकर संशयित मनराज दत्ताराम चव्हाण यांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील जयगडजवळ नांदिवडे (Jaigad Nandivade) येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळी पत्नीने बांबूने बेदम मारहाण करून हा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

सुरुवातीला आपण काही केले नाही, असा कांगावा करणाऱ्या पत्नीचा आणि संशयित प्रियकराचा बनाव ग्रामस्थांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे उघड झाला. दोघांनाही जयगड पोलिसांनी (Jaigad Police) खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सुरेश धोंडू पडवळ (वय ६४, रा. भंडारवाडी, नांदिवडे) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. शीतल सुरेश पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, २६ जानेवारीला शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आपण त्यांना अंगणात आणले. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे, अशी माहिती गावकऱ्यांना दिली.

तिने घराला बाहेरून कडी घालून घेतली आणि आपण काही केलेच नाही, अशा अविर्भावात पत्नी होती. महिलेने कांगावा केल्याची शंका गावकऱ्यांना होती. या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळातच पोलिस श्वानपथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जवळच झाडाखाली रक्ताने माखलेल्या बांबूच्या काठ्या दिसल्या. त्याचा वास श्वानाला देण्यात आला.

तेव्हा श्वान शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच दोन-तीन वेळा गेल्याने या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पत्नी शीतल सुरेश पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सुरेश पडवळ यांना होता. यावरून घरात सातत्याने भांडणे सुरू होती. याच रागात शीतल पडवळने निर्दयीपणे खून करत सुरेश पडवळ यांचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

जयगड पोलिसांनी संशयित शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण (रा. भंडारवाडा, नांदिवडे) या दोघांविरुद्ध भादंवि क ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. जयगडचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

यापूर्वीही झाला होता हल्ला

याप्रकरणी संशयित पत्नी शीतल पडवळ आणि तिचा कथित प्रियकर संशयित मनराज दत्ताराम चव्हाण यांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे. जयगड येथे राहणारे मृत सुरेश पडवळ हे मोलमजुरीचे काम करायचे. पत्नी शीतल पडवळ हिचा गावातच एक स्टॉल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापूर्वीही असा जीवघेणा हल्ला पती सुरेश पडवळ यांच्यावर पत्नीने केला होता, अशी माहिती आता तपासात समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT