illegal alcohol found in banda sindhudurg rupees 55 lakh in konkan 
कोकण

कोकण : बांद्यात गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतूकीवर कारवाई; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

निलेश मोराजकर

बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यातून पुण्याकडे जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी आज सकाळी पोलिस तपासणी नाक्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा दारुसाठा व ५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अलीकडच्या काळातील बेकायदा दारू वाहतुकीविरोधातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी टी. टी. कोळेकर, प्रथमेश पोवार, विजय जाधव यांनी केली. 

ट्रकच्या मागील हौद्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या खोक्यांचा साठा करून वाहतूक करण्यात येत होती. तपासणी नाक्यावरील पोलिसांनी नियमित तपासणी दरम्यान हौद्याची पाहणी केली असता, आतमध्ये विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूचे खोके मोठ्या संख्येने आढळले. हा ट्रक आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रकमधील दारुसाठा दुपारपर्यंत मोजमाप करण्याचे काम सुरु होते. सुमारे सहाशेहुन अधिक दारूचे खोके असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत मुद्देमालचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यातील केलेल्या कारवाईंपैकी  सर्वात मोठी दारु कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  या कारवाईत 600 हून अधिक गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे खोके जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT