illegal sand storage Action reddi konkan sindhudurg 
कोकण

वाळू उत्खननावर रेडीत छापा 

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे अवैध वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूकीबाबत महसूल विभागाने छापा टाकला. कारवाईचा सुगावा लागल्याने वाळू काढायच्या होड्या किंवा कामगार सापडले नाहीत; परंतु तेथे कामगारांसाठी बांधलेली झोपडी, वाळू काढण्यासाठी तयार केलेले तुटलेले रॅम्प दिसून आले. त्याची पंचयादी बनविल्याने वाळू काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

रेडी खाडीत मागील एक वर्षापासून स्थानिक वाळू तसकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरु होती. याबाबत त्यांचेवर कारवाई व्हावी यासाठी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्यावतीने महसूल अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, पोलीस व तलाठी यांना वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. यावेळी शिरोडा येथील मंडळ अधिकारी भानुदास चव्हाण, शिरोडा तलाठी फिरोज खान, रेडी तलाठी सोळंखी, रेडी कोतवाल कनयाळकर, गांधीनगर कोतवाल परब, रेडी पोलीस नाईक आदी उपस्थित होते. 

यापुढेही कडक कारवाई 
यापुढे रेडी खाडीत अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रविण लोकरे यांनी सांगितले. या संयुक्त कारवाईमुळे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार लोकरे यांचे संस्थेच्यावतीने आभार व्यक्त केले असल्याचे संस्थेचे सीईओ राजन रेडकर यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT