post-office
post-office 
कोकण

पाली उप टपाल कार्यालयाच्या सुविधांमध्ये सुधारणा

अमित गवळे

पाली - येथील उप टपाल कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी वर्गाची कमतरता तसेच इतर सोयी सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत सकाळने डिसेंबर  महिन्यात बातमी देऊन लक्ष वेधले होते. ही बातमी वाचून कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार काही बाबी पूर्ण झाल्या असून उर्वरित सोयीसुविधा लवकर पूर्ण केल्या जातील असे आश्वासन त्यांना संबधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.

त्यानुसार येथील नादुरुस्त प्रिंटर दुरूस्त करण्यात आले आहे.
तसेच टपाल कार्यालयाचे नामफलक जीर्ण झाले होते व ते दर्शनीय भागात देखील नव्हते.  ओसवाल यांनी बातमीच्या आधारे पाठपुरावा केल्यावर कार्यालयाच्या दर्शनी भागावर आकर्षक मोठे नामफलक बसविण्यात आले. 

कार्यालयातील रिक्त असलेले पदे लवकरच भरण्यात येतील असे वी एस घोलकर, सुपेरिडेंट ऑफ पोस्ट ऑफिस रायगड यांनी काळविले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची  तीव्र कमतरता आहे. वारंवार होणारी सेवा निवृत्ती तसेच काही   कर्मचारी पोस्ट ऑफिस ने सुरू केलेल्या विविध योजनांच्या (RCIT,IPPB,CSI) प्रशिक्षण करीत बाहेर जात असतात ही कारणे सांगितली. परंतु लवकरच रिक्त असलेले पदे भरण्यात येतील असे ओसवाल यांना लेखी काळविले आहे.

तसेच एटीएमची सुविधा असून सुद्धा मशीन न बसविल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते.  ही मशीन बसविण्यात यावी अशी मागणी ओसवाल यांनी केली. या बाबतीत सुरवातीला पंकज ओसवाल यांना असे काळविले की ही बाब आमच्या अधिकारात येत नाही. मात्र ओसवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले. त्यांनी त्वरित पाली येथे एटीएम सुविधा उपलब्ध केल्या जातील असे सूचित केले आहे.

सकाळ मधील बातमी वाचून यासंदर्भात पाठपुरावा केला. पाली उप टपाल कार्यालयात नियमाप्रमाणे ज्या सुविधा दिल्या पाहिजे त्या सर्व सुविधा मिळे पर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत.
- पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT