Inauguration of updated Molecular Diagnostic Laboratory and RT PCR Laboratory in sindhudurg 
कोकण

'शिवसेनेने प्रत्येक शब्द पाळला, हेच विरोधकांना चोख उत्तर'

सकाळ वृत्तसेवा

ओरोस - कोरोना तपासणी लॅब उभारण्याचा शब्द आम्ही पाळला. हे विरोधकांना दिलेले चोख उत्तर आहे. असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

जिल्हा रुग्णालयात 3 कोटी 21 लाख 83 हजार रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्विय निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे उद्‌घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयातून रिमोटद्वारे केले. यावेळी त्यांनी लॅब झाली म्हणून हायसे होवू नका. गाफिल न राहता लॅबमध्ये कोरोनाचे एकही सॅंपल येणार नाही. सिंधुदुर्ग निरोगी राहील, याची दक्षता घ्या असे आवाहन यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पदाधिकारी यांना केले.

पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले, "आम्ही सांगितल्या प्रमाणे करून दाखविले. जिल्ह्यात याच महिन्यात कोरोना तापासणी लॅब प्रत्यक्षात सुरु होईल असे आम्ही सांगितले होते. त्याप्रमाणे आज या लॅबचे उद्‌घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते झाले आहे. जिल्ह्यातील लोकांना आम्ही जो शब्द दिला तो पूर्ण केला आहे. त्यामुळे जे लोक ही लॅब होणार नाही, असे सांगून आमच्यावर टीका करत होते. त्यांना या लॅबचे उद्‌घाटन हेच चोख उत्तर आहे.'' 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून हा शुभारंभ केला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे मंत्रलयातील वेबरूममधून सहभागी झाले होते. तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री तथा उच्य व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, खासदार विनायक राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी, कोरोना विषाणुच्या पाश्वभूमीवर गेले तीन महीने जिल्ह्यात लॅब नसल्याने अडचण निर्माण झाली होती. पण ही गरज ओळखून अत्यंत तातडीने आपण ही लॅब मंजूर करून देत तिचा शुभारंभ केला. भविष्यात गणेशोत्सव आहे. यावेळी हा आजार अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तात्काळ निदान होण्यासाठी ही लॅब फायदेशीर ठरणार आहे. यावेळी लॅबबाबत विशेष माहितीपटाचे सादरिकरण करण्यात आले. आभार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वसेकर यांनी मानले. 


मेडिकल कॉलेजचा महिन्यात प्रस्ताव
श्री. सामंत म्हणाले, ""येत्या एक महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी याला आपली मान्यता दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही लवकरात लवकर सुरु होईल. 2021 मध्ये या महाविद्यालयात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाही सुरु होईल असे सांगतानाच सिंधुदुर्ग वासियांना शिवसेनेने दिलेला प्रत्येक शब्द पाळला जाईल
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : PNG कनेक्शन लगेच मिळणार, केंद्र सरकारचे राज्यांच्या यंत्रणांना आदेश

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT