कोकण

सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजेच गोपीनाथ मुंडे

CD

- Rat६p१८.jpg -
P२४M८८३२८
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मान्यवर.

सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजेच
गोपीनाथ मुंडे ः डॉ. परहर

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या तळागाळातून उगवलेल्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. मुंडेंसारखा तडाखेबंद लोकनेता कुठेच दिसत नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भले करणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजेच लोकनेते गोपीनाथजी मुंडे होय, असे उपप्राचार्य डॉ. वाल्मिकी परहर यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दगडू जगताप, संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, सहकोषाध्यक्ष सुनील मेहता, संचालक वैभव कोकाटे, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. धनपाल कांबळे, नितीन मेहता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला मिश्रा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तत्पूर्वी डॉ. धनपाल कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर डॉ. दगडू जगताप यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Latest Marathi News Live Update : इराणचे हल्ले रोखण्यावरून नवा वाद

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

SCROLL FOR NEXT