Increase in beneficiaries of Kisan Samman sindhudurg
Increase in beneficiaries of Kisan Samman sindhudurg 
कोकण

‘किसान सन्मान’च्या लाभार्थींमध्ये वाढ

नीलेश मोरजकर

बांदा : शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा, यासाठी दीड वर्षापूर्वी केंद्राने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (पीएम निधी) लाभ आतापर्यंत सावंतवाडी तालुक्‍यातील ८७ गावांतील ३२ हजार ५८१ शेतकऱ्यांनी घेतला आहे. या योजनेच्या निकषात बदल झाल्यावर लाभार्थींची संख्याही झपाट्याने वाढली.

ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करण्यात येणाऱ्या या योजनेत कित्येक शेतकऱ्यांची नावे अद्यापही प्रतीक्षा यादीत आहेत. प्रशासकीय पातळीवर पडताळणी केल्यावर ही नावे या योजनेत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे तालुक्‍यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत वाढ होणार आहे.

सुरवातीला या योजनेचे निकष हे जाचक असल्याने मर्यादित संख्येत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. सुरुवातीला दोन हेक्‍टर क्षेत्राची मर्यादा होती. त्यानंतर ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनादेखील या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्राने घेतला. या योजनेत सर्वसमावेशक शेतकऱ्यांनादेखील समाविष्ट करून घेऊन त्यांना लाभ देण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, कृषिमित्र यांच्यामार्फत या योजनेत नावनोंदणी केली.


सुरवातीला याला अल्प प्रतिसाद मिळाला. केंद्राने शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे एकूण सहा हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. पैसे जमा होत असल्याने कित्येक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज 
केले आहेत.


शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाल्याने नव्याने शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी केली आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रकरणे जिल्हा पातळीवर पेंडिंग आहेत. सर्व माहितीची पडताळणी करूनच नव्या नावांची नोंद करण्यात येत आहे. संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याने लवकरात लवकर प्रशासनाने कागदपत्रांची पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


सावंतवाडी तालुक्‍यातील गावनिहाय लाभार्थी शेतकरी असे

गुळदुवे (१३२), कास (४६३), मडुरा (५२२), निगुडे (४७१), पाडलोस (३६६), शेर्ले (७१२), रोणापाल (३००), इन्सुली (७६९), सातोसे (५६८), दांडेली (३३८), आरोस (४६६), साटेली तर्फ सातार्डा (२३४), सातार्डा (५४०), कारीवडे (६१३), आजगाव (४८१), आंबेगाव (२७८), आंबोली (६२०), आरोंदा (३८२), असनिये (३२९), बांदा ग्रामीण (५५५), बांदा शहर (५८४), कलंबिस्त (५५०), बावळाट (२२४), भैरववाडी (१२७), भालावल (२९४), भटपावणी (२५५), भोम (६२२), डेगवे (३५२), ब्राह्मणपाट (५१०), चराठे (६५३), चौकुळ (२१९), दाभिल (८८), दाणोली (१३७), देवसू (२६९), धाकोरे (३२०), डिंगणे (२२९), डोंगरपाल (१२४), फणसवडे (१०५), गाळेल (१४८), घारपी (९०), कवठणी (२३२), केगद (४७), केसरी (१८८), खडपडे (७), किनळे (५५०), कोलगाव (४३९), कोनस (२४३), कोंडुरा (१८८), कोनशी (५२), क्षेत्रफळ (५५०), कुडतरकर टेम्ब (११), कुंभार्ली (२७३),

कुंभारवाडा (६१२), कुणकेरी (४१२), माडखोल (८०८), माजगाव (५७३), मळेवाड (६६२), मळगाव (५४१), मसुरे (३९), नाणोस (१४२), नेमळे (६९२), नेने (१८०), नेतर्डे (२९१), न्हावेली (५६०), निरवडे (८८६), निरुखे (१७६), ओटवणे (५९६), ओवळीये (१६१), पडवे (३८), पडवे-माजगाव (११२), पारपोली (२४५), सांगेली (१०४७), सरमळे (२९२), सातुळी (४७३), सावरजुवा (२१९), सावरवाड (५७०), शिरशिंगे (५४९), सोनुर्ली (५०२), तळवडे (५०२), तळवणे (५०२), तांबोळी (५०२), तिरोडा (१९२), उडेली (२२), वेर्ले (२९२), वेत्ये (३८३), विलवडे (५९५), वाफोली (३९०). एकूण ३२ हजार ५८१ शेतकऱ्यांची या योजनेसाठी नावनोंदणी झाली आहे.

अशी होते नोंदणी
या योजनेसाठी आपण मोबाईलवरूनही ऑनलाईन नावनोंदणी करू शकतो. यासाठी मोबाईलवर केंद्राचे ग्रामस्वराज्य ॲप डाउनलोड करून घ्यावे. त्यातील सूचनांप्रमाणे सातबारा, बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक, पॅन क्रमांक या कागदपत्रांची पूर्तता करावी. नावनोंदणी झाल्यावर आपल्या मोबाईलवर संदेश येईल. आपण याच ॲपवर आपले नाव यादीत समाविष्ट झालेले आहे की नाही, हे तपासू शकता.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT