0 
कोकण

वैभववाडी तालुक्यात कोरोनापाठोपाठ तापसरीनेही काढले डोके वर

एकनाथ पवार

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : तालुक्‍यात कोरोनाचा धोका वाढला आहे. एकाच दिवशी गुरूवारी कोरोनाचे 22 रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिथवलीतील दिगशीत तापसरीचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

तालुक्‍यात 27 ठिकाणे कंटेन्मेंट झोन जाहीर आहेत. वाढत्या रुग्णांमुळे गुरूवारी तहसीलदारांच्या दालनात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आतापर्यंत चार ते पाचने वाढणाऱ्या बाधितांची संख्या आज तब्बल 22 ने वाढली. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. आज नाधवडे- 7, कोकिसरे- 1, एडगाव- 7, सडुरे- 2, कुर्ली- 1, नावळे- 2, करूळ- 1, नानीवडे- 1 असे एकूण 22 रुग्ण सापडले. बहुतांश गावांत रुग्ण सापडत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्‍यात सध्या 57 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 289 वर पोचली. वाढत्या रुग्णांमुळे सांगुळवाडी येथील कोविड सेंटर सुरू करण्यात आले. 

तालुक्‍यात रुग्ण वाढत असताना दुसरीकडे तिथवली येथील दिगशीत काही दिवसांपासून तापसरीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. ते सर्व रुग्ण स्थानिक दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्ण नेमके कोणत्या साथीचे आहेत, या संदर्भात अजूनही उलगडा झालेला नाही. दरम्यान, बुधवारी (ता. 7) येथील दोन रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी केली असता त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दिगशीत आरोग्य पथकामार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. 

तहसीलदार रामदास झळके यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस निरीक्षक अतुल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पवार, नायब तहसीलदार अशोक नाईक, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. धर्मे आदी उपस्थित होते. शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपायावर चर्चा झाली. 

दिगशी भागात तापसरीच्या साथीची माहिती मिळाली आहे. बुधवारी तेथील तीन रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर करण्यात आली. त्यातील दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आरोग्य विभाग गावात पथक पाठवून लक्षणे असणाऱ्यांची तपासणी करणार आहे. 
- डॉ. अनिल पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैभववाडी 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT