independent panel stand of rashtravadi in ratnagiri in 29 grampanchayat 
कोकण

रत्नागिरीत शिवसेनेला पर्याय ; २३ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी स्वतंत्र

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यस्तरावरील महाविकास आघाडी पाहायला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुक्‍यातील कार्यकर्ते प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोचण्यासाठी सरसावले आहेत. ५३ पैकी २३ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची तयारी पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणी चर्चा सुरू आहे.

शिवसेनेला पर्याय म्हणून ग्रामीण भागात राष्ट्रवादी आणि भाजप सज्ज झाले आहेत. शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेसने रत्नागिरीत तालुक्‍यात चांगली भरारी घेतली होती; परंतु नेत्यांनी अदलाबदल केल्यानंतर हा मतदारसंघ भगवेमय झाला. जिल्हा परिषदेपर्यंत सगळीकडेच शिवसेनेचाच बोलबाला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर विधानसभेसाठी इच्छुक असलेले बशीर मुर्तूझा, माजी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका सुरू आहेत. 

राष्ट्रवादीतर्फे कुरधुंडा, सोमेश्‍वर, डिंगणी, आगरनरळ, गावखडी, नाचणे यासारख्या प्रमुख ग्रामपंचायतींसह २३ ठिकाणी आपली स्वतंत्र पॅनल उभी करण्याची तयारी केली आहे. उमेदवार सज्ज असून महाविकास आघाडीचा निर्णय झालाच नाही, तर राष्ट्रवादी स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी तयार आहे. रत्नागिरी तालुकाध्यक्षपदाचा तिढा अजुनही सुटलेला नसल्याने राष्ट्रवादीत धुसफूस असली तरीही त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महाविकास आघाडीची बैठक लांबली

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी होण्यासाठी शनिवारी (ता. १९) बैठकीचे आयोजन केले होते; मात्र ती बैठक पुढे ढकलली आहे. त्यामुळे हा निर्णय प्रलंबित राहीला आहे. तोपर्यंत सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनीशी रणांगणात उतरणार आहेत.

महाविकास आघाडी असली तरीही

राज्यात महाविकास आघाडी असली तरीही राष्ट्रवादी आपली जुनी ओळख निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे. आघाडी करण्यापेक्षा राष्ट्रवादीतील नेत्यांकडून स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

"ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवबा मलिक यांच्या माध्यमातून ग्रामविकास साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून रत्नागिरीत होत आहे. सध्या ग्रामीण भागातील कार्यकर्तेही कामाला लागले असून त्याचा फायदा होईल."

- राजन सुर्वे, राष्ट्रवादी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT