कोकण

तटरक्षक दलाची रत्नागिरीत ४०० कोटींची कामे

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - किल्ला येथे सुसज्ज जहाज दुरुस्ती केंद्र आणि आधुनिक जेट्टी तर भाट्ये बीचवर अद्ययावत होवरपोर्ट असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीत उभारले जाणार असून, सुमारे ४०० कोटींची कामे हाताळली जात आहेत. या व्यतिरिक्त जहाज दुरुस्ती केंद्रासाठी सुमारे २०० कोटींची आर्थिक तरतूद अपेक्षित आहे.

भारतीय तटरक्षक दल ४२ व्या वर्षात पदार्पण करीत असून शुक्रवारी (ता. १ फेब्रुवारी) वर्धापन दिन साजरा केला जातो. रत्नागिरी कार्यालयाने जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी सेना दलात नोकरीसाठी प्रेरित करणारी व्याख्याने आयोजित  केली आहेत. यामधील विजेत्यांना वर्धापनदिनी सन्मानित करण्यात येणार आहे. १९७४ मध्ये के. एफ. रुस्तम यांच्या अध्यक्षतेखाली समुद्रमार्गाने तस्करी रोखण्यासाठी समिती स्थापन झाली. 

त्यांच्या शिफारशीनुसार तटरक्षक अधिनियम १९७८ अंतर्गत १ फेब्रुवारी १९७७ ला भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारी भागात तटरक्षक दलाने गेल्या वर्षभरात समुद्रात संकटात सापडलेल्या जहाजांना मदत, वैद्यकीय बचाव कार्य, टोईंग ऑपरेशन, ओखी वादळादरम्यान अडकलेल्या हजारो मच्छीमार जहाजांना मदत केली. किनारी गावांमध्ये संवाद कार्यक्रम आणि मच्छीमारांच्या मुलांना तटरक्षक दलात भरतीसाठी जागरूकता अभियान राबविले.

रत्नागिरी विमानतळावरील धावपट्टीचे विस्तार-अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तटरक्षक वायू अवस्थानच्या स्वतंत्र कार्यालय सज्ज आहे. धावपट्टी ते पार्किंग हॅंगर अशा विमान वाहतुकीसाठी आवश्‍यक ८ एकर खासगी जमिनीचा ताबा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक अतिरिक्त १२ एकर जमिनीच्या हस्तांतरणासाठी मान्यता मिळाली आहे. झाडगाव रहिवासी सदनिका उभारली जाणार आहे. 

वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी
२०१८ च्या सुरवातीला तटरक्षक अवस्थान रत्नागिरीला गस्ती, शोध व बचाव मोहीम उत्तमरीत्या राबविल्याबद्दल देशाच्या पश्‍चिम क्षेत्रातील सर्वोत्तम बेस म्हणून सन्मान मिळाला. वर्षभरात रत्नागिरीच्या ५ अधिकाऱ्यांना आणि जवानांना एकाच वर्षी डायरेक्‍टर जनरल इंडियन कोस्टगार्ड या मानाच्या पदकाने सन्मानित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT