कणकवली (सिंधुदुर्ग) - .शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एस. टी. बसस्थानक परिसरात भव्य व्यापारी संकुलाची उभारणी प्रस्तावित आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही त्यासाठी सकारात्मकता दाखवली असून पुढील बैठकीत कणकवलीच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केला. दरम्यान, कणकवली बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 140 गुंठे जागा संपादन करण्याचेही प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले.
कणकवली एस.टी. बसस्थानकाची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, सेना नेते संदेश पारकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, श्री. नेरुरकर, प्रमोद यादव, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, प्रसाद अंधारी व इतर उपस्थित होते. कणकवली बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या अनुषांने श्री.सामंत यांनी एस.टी. अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यात एस.टी.महामंडळाकडे सद्यःस्थितीत 8 एकर जागा आहे. यातील अडीच एकर जागा बसस्थानकासाठी तर अडीच एकर जागा डेपोसाठी आवशयक असल्याचे एस.टी.अधिकाऱ्यांनी सांगितले. तर उर्वरीत तीन एकर जागेत व्यापारी संकुल उभारण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी बसस्थानक विस्तारीकरणासाठी अडीच एकर ऐवजी साडे तीन एकर जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली. तर संदेश पारकर यांनी एस.टी.महामंडळाला आवश्यकता भासली तर आशिये रोडलगतची 140 गुंठे जागा एस.टी.महामंडळासाठी आरक्षित आहे. ही जागा ताब्यात घेण्याचीही सूचना केली.
परिवहन मंत्र्यांशीही चर्चा
दरम्यान, या चर्चेदरम्यान श्री. सामंत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी मोबाईलववरून संपर्क साधला. यावेळी झालेल्या चर्चेत कणकवलीत व्यापारी संकुल उभारण्याच्या अनुषंगाने सुसज्ज आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने कन्सल्टन्सी नेमून डिझाईन तयार करून घेऊन नंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. सामंत म्हणाले.
संपादन ः राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.