Injured in dog attack but Save the life of a rare deer ratnagiri 
कोकण

मोकाट श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुर्मिळ पिसुरी हरणाला मिळाले जीवदान

संदेश सप्रे

खेड (रत्नागिरी) : सध्या निसर्गाच्या अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. मग बिबट्या असो अथवा हरणासारखे प्राणी मानवी वस्तीशेजारी आढळून येत आहेत. असेच दुर्मिळ प्रजातीमधील ‘पिसुरी हरण’ भरणे नजीकच्या परिसरात आढळून आले. मोकाट श्वानाच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या हरणाला नागरिकांनी जीवदान दिले. 


भरणे नाक्यानजीक जगबुडी नदीकिनारी शुक्रवारी (ता. 11) रात्री दुर्मिळ पिसुरी हरीण आढळले. हरणाला जीवदान देऊन जागरूक नागरिकांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. शुक्रवारी रात्रीच्यावेळी जगबुडी नदीकिनारी काही भटक्या श्वानांची झुंड या हरणाच्या मागे लागून हरणावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. जीव वाचविण्यासाठी नदीकिनारी धावत असल्याची बाब भरणे नाका येथील प्राणीमित्र प्रतीक पाटणे, स्वप्नील पाटणे, नागेश साळवी, वैभव साळवी, युवराज पाटील, मुकेश सुंदेशा, दीपक पाटणे, जनार्दन कदम, प्रतीक तायकांडी, नरेश हंबीर, सागर कवळे, गणेश कदम यांच्या निदर्शनास आले. त्याला श्वानाच्या तावडीतून सोडवले व सुरक्षित ठिकाणी आणले.

शनिवारी खेडचे वनपाल अनिल दळवी यांना याविषयी कळवल्यानंतर त्यांच्या सहकार्‍यांसह त्यांनी घटनास्थळी येऊन प्राण्यांची पाहणी केली. भरणे येथे आढळलेला वन्यप्राणी दुर्मिळ पिसुरी प्रजातीचे हरीण असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. या प्राण्याला वनाधिकारी दळवी यांनी ताब्यात घेतले. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या प्राण्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT