Inquiries by ED officials today 7 places related Anil Parab Vibhas Sathe land purchase dhabhol sakal
कोकण

अनिल परब यांच्याशी सबंधित ७ ठिकाणी आज इडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी

विभास साठे यांचेकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : केंद्रींय पर्यावरण मंत्रालयाच्या कारवाईनंतर दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसाँर्टमध्ये इडीचे अधिकारी चौकशीसाठी आज सकाळी ६.३० वाजता दाखल झाले असून दुपारपर्यंत ३ अधिकाऱ्यांकडून हि चौकशी सुरु होती. राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी सबंधित ७ ठिकाणी आज इडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असून याच कारवाईचा एक भाग म्हणून इडीच्या मुंबई येथील कार्यालयातील ३ अधिकारी मुरुड येथील साई रिसाँर्ट येथे आज सकाळी ६.३० वाजता दाखल झाले आहेत.

विभास साठे यांचेकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती, काही दिवसांनी अनिल परब यांनी हि जागा त्यांचे निकटवर्तीय व माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी विकली होती, त्यावर सदानंद कदम यांनी अलिशान असे साई रिसाँर्ट बांधले आहे. हे रिसाँर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रार भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती या तक्रारीनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी मुरुड येथे येवून पाहणी केली होती व पर्यावरण मंत्रालयाला अहवाल सदर केला होता त्यानुसार पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेले हे साई रिसाँर्ट तोडून टाकावे असे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते तसेच दापोली न्यायालयात या संदर्भात एक खटलाही दाखल केला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड येथील हि जागा उद्योजक सदानंद कदम यांना विकलेली असली तरी त्यात अनिल परब यांचे हितसंबंध असल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केले आहेत. मध्यंतरी आयकर विभागाने केलेल्या चौकशीत साई रिसाँर्ट बांधण्यासाठी केलेल्या खर्चाबाबतही माहिती घेतली होती, त्यानंतर आज मंत्री अनिल परब यांचेशी संबंधित ठिकाणी इडीच्या अधिकार्यांनी छापे मारले आहे.

मुरुड येथे इडीचे ३ अधिकारी मुंबई येथून आज सकाळी ६.३० वाजता साई रिसाँर्ट येथे दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे. मात्र साई रिसाँर्ट मुरुड येथे कोणताही पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही.आज सकाळी ६.३० वाजताच या चौकशीला सुरवात झाली असल्याने मुरुड येथील अनेकांना अधिकारी चौकशीला आले असल्याची माहितीच नव्हती. इडीच्या या कारवाईने दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT