Umesh Shivgan sakal
कोकण

Umesh Shivgan : उच्चशिक्षित उमेश शिवगणचा प्रेरणादायी प्रवास ; सामाजिक उपक्रमांतही सहभाग

उच्चशिक्षण घेवून भविष्यामध्ये उच्चपदस्थ नोकरी करण्याचे बहुतांश युवावर्गाचे स्वप्न असते. मात्र, उच्चशिक्षितांची दरवर्षी वाढणारी संख्या, त्याच्याजोडीने वाढती स्पर्धा यामुळे नोकरी मिळविणे मुश्किल झाले आहे.

राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा

कोकण,राजापूर : उच्चशिक्षण घेवून भविष्यामध्ये उच्चपदस्थ नोकरी करण्याचे बहुतांश युवावर्गाचे स्वप्न असते. मात्र, उच्चशिक्षितांची दरवर्षी वाढणारी संख्या, त्याच्याजोडीने वाढती स्पर्धा यामुळे नोकरी मिळविणे मुश्किल झाले आहे. त्याचवेळी गेल्या काही वर्षामध्ये शासनाकडून नोकर भरती झालेली नसल्याने अनेक उच्चशिक्षितांचे शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहीले आहे.

त्यातून, नोकरीअभावी बेरोजगारांची संख्या वाढली असली तरी, अशा बेरोजगारांकडून व्यवसायाची कास धरतानाचे चित्र समाजामध्ये कमी प्रमाणात दिसते. मात्र, तालुक्यातील पन्हळेतर्फ राजापूर येथील उच्चशिक्षित युवक उमेश शिवगण यांनी स्वतःच्या व्यवसायाची केलेली उभारणी नोकरीअभावी बेरोजगार असलेल्यांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी म्हणावी लागेल.

मुंबई-गोवा महामार्गावर त्यांनी आई-वडीलांच्या नावाने गोकुळ लक्ष्मी रसवंतीगृह उभारले आहे. त्याच्या जोडीने त्या ठिकाणी ऊसाच्या रसाच्या विक्रीसोबत कलिंगड आणि पाण्याच्या बॉटल्स विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला स्वयंरोजगाराचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.  

एम.ए.डी.एड असे उच्चशिक्षण घेतल्यानंतर इतर युवकांप्रमाणे उमेश यांनी नोकरीला प्राधान्य दिले होते. मात्र, विविध कारणांमुळे उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न काहीसे अधुरे राहीले. त्याने निराश न होता त्यानी रोजगारनिर्मितीसाठी व्यवसायाची कास धरली आहे. त्यातून, त्यांनी आई-वडीलांच्या नावे गोकुळ लक्ष्मी रसवंतीगृह सुरू केले आहे.

ऊसाच्या रसासोबत या ठिकाणी कलिंगड आणि पाण्याच्या बॉटल्स विकण्याचाही ते व्यवसाय करतात. रसवंतीगृहाच्या व्यवसायामध्ये त्यांना त्यांचे भाऊ आणि मित्रमंडळींचे सहकार्य लाभले आहे. उत्तम दर्जाचा ऊसाचा रस, स्वच्छता आणि ग्राहकांशी आपुलकीचा संवाद यांमुळे त्यांच्या व्यवसायाला लोकांकडून चांगलीच पसंतीही मिळताना दिसत आहे.

केवळ व्यवसाय करून आर्थिक प्रगती न साधता विधवा प्रथा बंद करणे, अंधश्रद्धा निर्मुलन करणे यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करीत ते सामाजिक बांधिलकीही जोपासत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाची निर्मिती करून त्याद्वारे पुस्तक वाचनाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे अन् समाजाला नवी दिशा देण्याचेही काम करीत आहेत. शहरातील राजापूर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योगा आणि खेळाचे धडेही ते देतात. नोकरीच्या मागे न धावता उमेश यांनी स्वतःच्या व्यवसायाच्या केलेली उभारणी निश्‍चितच इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.

उमेश शिवगण, व्यवसायिक

“ गेल्या काही वर्षामध्ये नोकर भरती झालेली नसल्याने उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे आपले स्वप्न अधुरे राहीले आहे. मात्र, त्याने निराश न होता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये कुटुंबियांचे आणि मित्रमंडळींचे सहकार्य लाभले आहे. भविष्यामध्ये व्यवसायाची व्याप्ती वाढविताना त्यामध्ये नाविण्यतता आणण्याचा निश्‍चितच प्रयत्न करणार आहे.” 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT