Instead Of Water He Drink Petrol Incidence In Sindhudurg  
कोकण

पाणी समजून एकाने पिले पेट्रोल अन्..

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - रूग्णाचे प्राण वाचवणे महत्वाचे समजून खाजगी रूग्णवाहिका चालकाने स्वतःच जीव धोक्‍यात असतानाही रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहचविले; मात्र घाईगडबडीत त्याने पाणी म्हणून चुकून पेट्रोल पिला.

अशातच त्याने प्रथम रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेले व त्यानंतर येऊन उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल झाला. हा प्रकार आज पहाटे साडे पाचच्या सुमारास घडला. हेमंत वागळे (वय 25, रा. इन्सुली), असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. हेमंत हा युवक येथील एका खाजगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कामाला आहे; मात्र रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सहकार्य करणे हे तो आद्य कर्तव्य समजतो.

येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नेहमीच त्याचे सहकार्य लागते. रुग्णाला आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ बांबुळी रुग्णालयात पोचवीत असताना घाईगडबडीत बाजूला असलेले पेट्रोल त्याने पाणी समजून प्राशन केले; मात्र तशाच परिस्थितीत त्याने रुग्णाला रुग्णालयात पोचविले व नंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वतःवर उपचार करून घेतले. उपचार घेण्यास उशिर झाल्याने घशाला गंभीर दुखापत झाली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

Bangkok Return Youth Death : बँकॉकहून परतलेल्या तरुणाचा शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत मृतदेह; हातात कंडोमचं पाकीट, झाडावर टांगलेले कपडे, तोंडातून येत होता फेस!

सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी होणार; तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

SCROLL FOR NEXT