Institutional Quarantine For Three Mango Transporters In Sindhudurg  
कोकण

आंबा वाहतूक करणारे तिघे संस्थात्मक क्‍वारंटाईन 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोलगाव ते मुंबई - वाशी अशी आंबा वाहतूक करणाऱ्या कोलगाव येथील चालकाला तसेच क्‍लिनरला बुधवारी (ता. 6) उशिरा संस्थात्मक क्‍वारंटाईन केले आहे. न्हावेली येथील एका आंबा वाहतूक करणाऱ्या चालकालाही संस्थात्मक क्‍वारंटाईन केले आहे. 

तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. जीवनावश्‍यक वस्तू, जागेची अडचण आदी अनेक प्रसंग आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहेत. हे सर्व आव्हाने व त्यांचा सामना करत आरोग्य विभागाने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची योग्य पद्धतीने व्यवस्था केली आहे. गाव पातळीवर संस्थात्मक क्‍वारंटाईन वेगळ्या पद्धतीने केले जात आहे. त्यासाठी बाहेरून गावात येणार यांची यादी आरोग्य विभागाला देऊन गावपातळीवरील सर्वांनी आरोग्य विभागाला योग्य सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी केले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मुंबई - वाशी या भागात आंबा वाहतुकीयांचा हंगाम सुरू झाला आहे. सावंतवाडी तालुक्‍यातून मोठ्या संख्येने चालक आंब्याची वाहतूक मुंबई येथे करत आहेत. एजंट आणि आंबा बागायतदार तसेच चालक सातत्याने मुंबईवारी करत आहेत. त्यामुळे या सर्व बाबी आरोग्य विभागाची डोकेदुखी ठरत आहेत.

वेंगुर्ले-खानोली येथे आंब्याची वाहतूक करणाऱ्या मुंबईतील चालकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच सावंतवाडी तालुक्‍यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबई - सावंतवाडी असा प्रवास करणाऱ्या चालकांना संस्थात्मक क्‍वारंटाईन केले जात आहे. प्रशासनाचे एवढी धडपड सुरू असतानाही नागरिक, वाहतूकदार, मालवाहतूक करणारे चालक, क्‍लीनर सर्व काही आलबेल आहेत असेच वागत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT