कोकण

जातीचा उंबरठा ओलांडून तब्बल 208 जोडपी विवाहबंधनात!

जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह; नव्याने १३ प्रस्ताव

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात (sindhudurg district) दोन वर्षांत जातीचा उंबरठा ओलांडून आंतरजातीय विवाह (inter caste marriage 208) करणाऱ्या २०८ जोडप्यांना १ कोटी २ लाख ९५ हजार एवढे प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांना शासनाने प्रोत्साहित केले आहे. २०२१-२२ मध्ये नव्याने १३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाकडून मिळाली. समाजामधील जातीय मतभेद नष्ट व्हावेत, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

२०१० पूर्वी विवाह झालेल्या जोडप्यांनी या योजनेचा अद्याप लाभ घेतला नसल्यास त्या जोडप्याला १५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. यातील ५० टक्के रक्कम केंद्र व उर्वरित ५० टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. आंतरजातीय विवाह केलेली (state government) जिल्ह्यातीलही जोडपी या योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यात जातीय अस्पृश्यता हळू- हळू कमी होताना दिसत आहे. जातीय सलोखा राखतानाच जिल्ह्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना १ फेब्रुवारी २०१० पूर्वी विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये तर त्यानंतर विवाह झाला असल्यास शासनाकडून ५० हजार रुपये एवढे प्रोत्साहन अनुदान दिले जाते. तरी या योजनेचा पात्र लाभार्थिनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. या योजनेत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण म्हणजे हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते आणि त्यांना लाभ दिला जातो.

जिल्ह्यातील स्थिती

२०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांत २०८ जोडप्यांनी जातीचा उंबरठा ओलांडला. यातील २०१९-२० व २०२०-२१ मध्ये प्रस्ताव केलेल्या २०५ जोडप्यांना ५० हजार रुपये प्रमाणे १ कोटी २ लाख ५० हजार रुपये एवढे तर २०१० पूर्वी लग्न केलेल्या ३ जोडप्यांना १५ हजार रुपयांप्रमाणे ४५ हजार रुपये, असे एकूण २०८ जोडप्यांना १ कोटी २ लाख ९५ हजार रुपये एवढे अनुदान वितरीत झाले आहे. तर २०२१-२२ मध्ये नव्याने १३ जोडप्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT