कोकण

कोकण किनारपट्टीवर सात ते आठ मिनी पर्ससीन नौकांची घुसखोरी, कुठे घडला हा प्रकार वाचा 

प्रशांत हिंदळेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्‍यातील आचरा बंदरासमोर सात ते आठ मिनी पर्ससीननेट नौका साडेबारा वावाच्या आतमध्ये बेकायदेशीररित्या मासेमारी करत असल्याचे आज सकाळी गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांना दिसून आले. घुसखोरीमुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये संताप आहे. या प्रकरणी पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी मत्स्य विभागाचे लक्ष वेधत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

दांडी, वायरी, दांडी आवारवाडी, तळाशील, धुरीवाडा येथील गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने मासेमारी करण्यासाठी आचरा व आजूबाजूच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मासेमारीहून परतत असताना सात ते आठ मिनी पर्ससीन नेट नौका साडेबारा वावाच्या आतमध्ये मासेमारी करत असल्याचे त्यांना दिसून आले. एक सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत साडेबारा वावाच्या बाहेर परवानाधारक पर्ससीन नेट नौकांना परवानगी असताना या नौका साडेबारा वावाच्या आतमध्ये मासेमारी कशी काय करू शकतात, असा सवाल पारंपरिक मच्छीमारांनी उपस्थित केला. दरम्यान, मिनी पर्ससीन नेटद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीवर मत्स्य विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी श्री. पराडकर यांनी केली आहे. 

श्री. पराडकर म्हणाले, ""राज्याच्या सागरी हद्दीतील मत्स्य साठ्यांवर स्थानिक क्रियाशील मच्छीमारांचाच अधिकार आहे आणि तसा कायदा शासनाने पारित करायला हवा. आज अनधिकृतपणे मिनी पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या नौकांवर मोठ्या प्रमाणात परराज्यातील खलाशांचा वावर होता. त्यामुळे या नौका स्थानिक होत्या की परराज्यातील याची चौकशी मत्स्य विभागाने करून त्याविरोधात कडक कारवाई करायला हवी. परराज्यातील खलाशांना मोकळीक मिळत असल्यानेच अनधिकृत मिनी पर्ससीन नेटची संख्या वाढत आहे. परराज्यातील खलाशांचा वावर असलेल्या अशा अनधिकृत मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाने आजवर कडक कारवाई न केल्यानेच एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. तरी राज्य सरकारने अनधिकृत पर्ससीन नेट मासेमारीबरोबरच परराज्यातील खलाशांच्या वाढत्या अतिक्रमणास कायदेशीर आळा घालावा. अन्यथा स्थानिक पारंपरिक मच्छीमारांसमोरील मत्स्य दुष्काळाची समस्या कायम राहणार आहे.'' 

स्थानिक मच्छीमारांचा रोजगार परराज्यातील मासेमारी नौका आणि परराज्यातील खलाशी हिरावून नेत असतील तर शासनाने या गोष्टीची वेळीच गंभीर दखल घ्यायला हवी.
-महेंद्र पराडकर, पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News Sangli : तू माझे स्टेटस का बघत नाहीस? थेट गेला महिलेच्या घरी अन्... तलवार काढून महिलेसोबत केलं भयानक कृत्य

PM Modi Video Viral : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल! गमछा हवेत फिरवत शेतकऱ्यांना दिला खास संदेश

ट्रेनमध्ये तिकीट बूकिंगच्या नियमात बदल, लोअर बर्थ कुणाला मिळेल? झोपण्याची वेळही ठरली

Shreyas Iyer ला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज! नेमकं काय घडलं, भारतात कधी परतणार? BCCI ने दिले नवे अपडेट्स

Business Strategy : स्टार्टअपचा गेमचेंजेर! डिजिटल युगात टिकायचंय? मग शिका सोशल मीडियाचं मार्केटिंग कौशल्य

SCROLL FOR NEXT