कोकण

तपास अधिकाऱ्यांकडून नितेश राणेंना पोलिस कोठडीची मागणी

नितेश राणे यांना पोलिस कोठडी होणार की अन्य निर्णय होणार याबाबतची उलट सुलट चर्चा सुरु आहे.

तुषार सावंत

नितेश राणे यांना पोलिस कोठडी होणार की अन्य निर्णय होणार याबाबतची उलट सुलट चर्चा सुरु आहे.

कणकवली - नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण आले असून थोड्याच वेळात पोलिस आपले म्हणणे मांडणार आहेत. सरकारी वकील प्रदीप धरत हे सरकाच्या वतीने बाजू मांडणार आहेत. त्यामुळे नितेश राणे यांना पोलिस कोठडी होणार की अन्य निर्णय होणार याबाबतची उलट सुलट चर्चा सुरु आहे. आमदार नितेश राणे हे काही वेळापूर्वीच कणकवली न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत वकिलांचा पोस्ट फाटा आहे. न्यायालयाच्या आवारात माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या बाहेर माध्यमांची गर्दी आहे.

दरम्यान, संपूर्ण परिसराला पोलिसांच्या छावनीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. न्यायालयाच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर थेटपणे संशयाची सुई वळली होती. पोलिस तपासातही त्यात पुरावे सापडल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली. जिल्हा सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तरीही त्यांना पुन्हा एकदा कणकवलीच्या मॅजेस्टिककडे शरण येण्याची वेळ आली आहे. ही प्रक्रिया आता सुरू असून काही वेळातच राणेंच्या कोठडी बाबतचा निर्णय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT