Khalapur Irshalwadi Landslide Esakal
कोकण

Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीतील मदतकार्य तात्पुरतं थांबवलं! मुसळधार पावसामुळं अडचणी

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात आज व उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Irshalwadi Landslide: रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे ५० घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून आत्तापर्यंत इथं अविरतपणे बचावकार्य सुरु होतं.

पण आता हे बचावकार्य तात्पुरतं थांबवण्याचा निर्णय एनडीआरएफनं घेतला आहे. या परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्यानं हे बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Irshalwadi Landslide Relief work temporarily stopped difficulties due to heavy rains)

सध्या या परिसरात बचाव कार्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यानं एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळं आजचं बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी परिस्थिती पाहुन पुन्हा एकदा बचावकार्य सुरु करण्यात येणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

१२ जणांचा मृत्यू, १०३ बचावले

आज सकाळपासूनच जोरदार मदतकार्य सुरु करण्यात आलं. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात आज व उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

दरम्यान, शासन प्रत्येक बाबीवर बारकाईनं नजर ठेवून आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT