कोकण

भाजपचे कार्यकर्ते असहकार्यावर ठाम

सकाळवृत्तसेवा

मालवण - युतीचा धर्म पाळा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असला तरी युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार तूर्तास न करण्याचा निर्णय भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. शिवसेना उमेदवाराबाबत कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असेही या बैठकीत ठरल्याचे समजते. 

जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्र्यांनी युतीचा धर्म पाळा, असे आदेश दिल्याचे स्पष्ट केल्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता कमी झालेली नसून ते नाराज आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज तालुक्‍यात अज्ञातस्थळी या नाराज कार्यकर्त्यांनी बैठक घेतल्याची माहिती मिळाली. बैठकीस सुमारे ४२ हून अधिक कार्यकर्ते उपस्थित असल्याचे कळते.

जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडून प्रचंड दबाव आल्याने काही पदाधिकाऱ्यांनी अन्य वाहनांचा वापर करत बैठकीचे अज्ञातस्थळ गाठल्याचे समजते. बैठकीत जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेला निर्णय हा एकतर्फी असल्याने आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडू. त्यानंतर जो निर्णय मुख्यमंत्री देतील, त्यानुसार पुढील निर्णय जाहीर करू, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. तोपर्यंत शिवसेना उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : खलील अहमदने दिला मुंबईला पहिला झटका; सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

T20 WC 24 India Squad : अजित आगरकर पोहचला दिल्लीत; लवकरच निश्चित होणार भारताचा वर्ल्डकप संघ?

SCROLL FOR NEXT