कोकण

गडनदी पुलावरील भराव खचला 

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आणि त्याचा दर्जा पावसाला सुरुवात होण्यापूर्वी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गडनदी पुलाजवळील भराव आज सायंकाळी खचला. हा प्रकार लक्षात येताच नागरिक, वाहनचालक संतप्त झाले. त्यांनी वाहतूक रोखून धरली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रांत, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी ठेकेदाराच्या यंत्रणेला तंबी देत तत्काळ भरावी करावा, अशी सूचना केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

पावसाच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तीन-तेरा वाजले आहेत. कणकवलीचे नागरिक गेले पंधरा दिवस त्रस्त असून सातत्याने भराव खचत आहेत. आज तर कहर झाला. गडनदीवरील नवीन पूल बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भराव खचला. तेथे पुलाच्या तोंडावर टाकलेला भराव निकृष्ट दर्जाचा होता. काल (ता.19) सायंकाळी झालेल्या पावसानंतर भराव हळू खचू लागला. आज दुपारनंतर पुलाकडेला मोठे भगदाड पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता होती. नागरिकांना याची माहिती मिळताच गडनदी पुल परिसरात जमाव दाखल होऊ लागला. 

घटनास्थळी कन्हैया पारकर, संदीप सावंत, मिलिंद मिस्त्री आदी विविध पक्षाचे कार्यकर्ते गोळा झाले. त्यांनी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला. याचवेळी तहसीलदार संजय पावसकर तब्बल अर्धा तास दिलीप बिल्डकॉनच्या कामगारांची वाट पाहत होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी रस्ता रोखला. घटनास्थळी प्रांत चंद्रकांत मोहिते हेही दाखल झाले. त्यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांशी चर्चा करून तत्काळ भराव करावा, अशी सूचना केली. त्यानंतर दिलीप बिल्डकॉनच्या अभियंत्यांनी घटनास्थळी येत हे काम एका रात्रीत पूर्ण करून देतो, असे आश्‍वासन दिले. यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. 

धोका कायम 
महामार्गाच्या पर्यायी रस्त्यांचीही भराव खचत असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. मुसळधार पावसात मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता असून वेळीच लक्ष न घातल्यास नागरिकांचा जीव जाण्याची भिती आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांना महिलेनं झापलं? आता तिनेच सांगितलं सत्य; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून...

Nashik News: धर्मांतर व बलात्कार प्रकरण गंभीर; फरार निदा खानचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय!

Sangli Yerala River Drowning : येरळा नदीत ८ जण बुडाले, एका तरुणीचा मृत्यू; पोहण्याचा मोह ठरला जिवघेणा

Mumbai Pune Expressway: दोन्ही मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुले; ‘मिसिंग लिंक’ची ‘मुंबई लेन’ सकाळी बंद अन् दुपारी दिलासा, वाहनचालकांना मनस्ताप!

Perfect Sunday Breakfast: झटपट बनवा कुरकुरीत आणि हेल्दी 'रवा टोस्ट', रविवारच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT