कोकण

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीने हाल

सकाळवृत्तसेवा

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी तसेच वाहन चालक बेहाल झाल्याचे चित्र होते. शहरातील अंतर्गत रस्ते देखील वाहतूक कोंडीने ठप्प झाले होते. महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरण कामासाठी केलेले ठिकठिकाणचे अडथळे आणि त्यावर मार्ग काढण्यात संबंधित अधिकाऱ्यांना आलेले अपयश याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील तेलीआळी डीपी रोड ते नरडवे तिठा या दरम्यान सर्व्हिस रोड तयार करून वाहतूक सुरू केली आहे; मात्र हा सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यालगत वाहन पार्किंग होत असल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. याखेरीज डीपी रोड येथे जंक्‍शन झाल्यानेही वाहने अडकून पडत आहेत.

महामार्गावरील वाहतूक कोंडी सुसह्य होण्यासाठी महामार्गावरील पटवर्धन चौक ते तेलीआळी डीपी रोड दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविल्यास कोंडीतून सुटका होऊ शकते. मात्र त्याकडे हायवे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची टीका शहरवासीयांतून होत आहे. कणकवली नगरपंचायतीने तेलीआळी डीपी रोड येथील अतिक्रमणे हटविली तर महामार्ग विभागाकडून त्यांच्या हद्दीमधील अतिक्रमणे का हटविली जात नाहीत? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आज सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल चार किलोमिटर अंतरापर्यंत वाहने खोळंबली होती. दुपारचा तीव्र उकाडा आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे प्रवासीही बेहाल झाल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT