पद्मदुर्ग जागर सोहळ्यात सहभागी झालेले शिवप्रेमी.
पद्मदुर्ग जागर सोहळ्यात सहभागी झालेले शिवप्रेमी. 
कोकण

पद्मदुर्गावर फुटल्या आठवणींच्या लाटा

सकाळवृत्तसेवा

महाड/ मुरूड - हिंदवी स्वराज्याच्या आरमार उभारणीत महत्त्वाचा जलदुर्ग ठरलेल्या पद्मदुर्गाच्या ऐतिहासिक स्मृतींना २४ व २५ डिसेंबरला ‘जागर’ कार्यक्रमातून लखलखीत उजाळा मिळाला. पद्मदुर्गावर रविवारी (ता. २५) हा आठवा जागर सोहळा झाला. 

महाडचे कोकण कडा मित्र मंडळ आणि शिवप्रेमींच्या दांडग्या उत्साहातून ‘एक दिवस इतिहासाचा... जागर पद्मदुर्गचा’ या कार्यक्रमात थरार, साहसाचा अनुभव नागरिक, पर्यटकांनी मनमुराद घेतला. कोकण कडा मित्र मंडळ व मुरूड नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच अलिबागच्या संदीपभाऊ मित्र मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा झाला.  

भगवे फेटे, टोप्या, भगवे झेंडे घेऊन पारंपरिक पेहरावात आलेले मावळे आणि फुलांनी सजविलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शाही पालखी असा ऐतिहासिक साज पद्मदुर्गावर बघायला मिळाला. स्थानिक नागरिकांसह भिवंडी, कल्याण, पुणे, सातारा व रायगड जिल्ह्यामधून आलेल्या शिवभक्तांनी दुर्ग बहरला होता. ‘जागर’च्या निमित्ताने कोकण कडा मित्र मंडळाने एक दिवस आधी किल्ले रायगड ते पद्मदुर्ग अशी शिवपालखी मोहीम घेतली. यात पाचाड, खर्डी, नांदगाव, लाडवली, महाड, केंबुर्ली, वहूर, दासगाव, माणगाव, तळा, शिघ्रे, तेलवडे व मुरूड येथील शिवभक्त सहभागी झाले. स्थानिक सरपंच व ग्रामस्थांनी शिवपालखीचे स्वागत केले होते. 

अलिबागच्या संदीपभाऊ मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वाघपंजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. मुरूडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. मुरूड शहरप्रमुख व नगरसेवक प्रमोद भायदे, ऑल इंडिया पॅसेंजर संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, नगरसेविका दांडेकर, बाळा साखरकर यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

सोहळ्याचे रंग
पद्मदुर्गावर शेकडो शिवप्रेमींकडून सकाळपासून स्वच्छता व सुशोभीकरण. 
सकाळी साडेअकरा वाजता शिवपुरोहित प्रकाशस्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारात गडपूजनाला प्रारंभ. 

शिवप्रतिमेच्या पूजनानंतर ज्ञानेश्वर काकडे पथकाने पारंपरिक देवीचा गोंधळ सादर केला. संबळ व ढोलकीच्या तालावर अनेक पर्यटकांनी दिवट्या घेऊन पारंपरिक नृत्य केले.

लोकशाहीर नितीन मिठाग्री यांच्या पथकाने पोवाडे व गीत सादर केले. 
पद्मदुर्गाच्या तटबंदीवरून छत्रपती शिवाजी महाराजांची शाही पालखी मिरवणूक काढण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT