Janshatabdi Express Got Stop In Sawantwadi Sindhudurg Marathi News
Janshatabdi Express Got Stop In Sawantwadi Sindhudurg Marathi News 
कोकण

कोकण रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेसला मिळाला सावंतवाडी थांबा

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - मळगाव रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आलेल्या जनशताब्दीला आणखी तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मिळाला आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 

कोकण रेल्वे व्यवस्थापन आणि रेल्वे मंत्रालयाकडे खासदार राऊत यांनी जनशताब्दीला थांबा मिळावा म्हणुन प्रयत्न केला, त्याला यश आले आहे असे खासदार राऊत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. जनशताब्दी एक्‍सप्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा नव्हता. तो मिळावा म्हणून प्रवासी संघटनेने आंदोलन केले होते. खासदार राऊत यांनी मागणी घेऊन रेल्वे मंत्रालय आणि कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने जनशताब्दीला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला. त्याची मुदत संपत असल्याने रेल्वे बुकिंग बंद केले होते. 

खासदार राऊत यांनी जनशताब्दी एक्‍सप्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर यापुढेही थांबा मिळावा म्हणून पुन्हा पाठपुरावा केला. जनशताब्दीला सुमारे साडेतीनशे प्रवासी आरक्षण या स्थानकावर होत असल्याने थांबा कायमस्वरूपी मिळावा म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी खासदार राऊत यांचे लक्ष वेधले होते. येथील रेल्वे स्थानकावर या रेल्वेचे बुकिंग बंद करण्यात आले असून रेल्वे थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याने पुढे चालू ठेवण्यासाठी खासदार राऊत यांनी कोकण रेल्वे व्यवस्थापन आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. जनशताब्दीला आणखी तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आल्याची माहिती श्री. राऊत यांनी दिली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सावंत, भाई देऊलकर यांनी समाधान व्यक्त केले. खासदार राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांची मंत्रालयात भेट घेतली होती, असे श्री. सावंत यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT