jayant patil is on tour of konkan said in rashtravadi spread in ratnagiri fastly 
कोकण

आता घड्याळाची टिकटिक होणार वेगाने

राजेश कळंबटे

रत्नागिरी : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धडक देणारी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यामुळे पक्षवाढीसाठी सरसावली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पक्षवाढीसाठी बळ मिळावे, अशी मागणी प्रत्येक तालुक्‍याच्या बैठकीत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला सक्षम नेतृत्व मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी राष्ट्रवादीने पाय रोवत तिन मतदारसंघांवर प्रभुत्व निर्माण केले. भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम यांच्या तगड्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समितींसह ग्रामपंचायतींमध्येही धडक मारली; परंतु जाधव, सामंतांनी पक्षबदल केले आणि सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. नेते गेले तरी कार्यकर्ता स्थिर आहे. पण सक्षम नेतृत्वाअभावी कार्यकर्ते अस्थिर आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत चिपळूणातून शेखर निकम तर लोकसभेला जिल्ह्याच्या उत्तर भागातून सुनील तटकरे निवडून आले. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीने कोकणातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी दौरे सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी खेड-दापोलीमध्ये खासदार तटकरे यांनी आढावा बैठका घेत माजी आमदार संजय कदम यांना बळ देण्यासाठी पावले उचलली होती. त्यांच्या या कृत्यामुळे आमदार योगेश कदम यांनी टोकाची भूमिका घेत हक्‍कभंग दाखल केला.

महाविकास आघाडी असल्याने दोन्ही पक्षात समन्वय नसल्याचे आढळून आले आहे. या प्रकारात हस्तक्षेप न करता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तटकरेंची बाजू उचलून धरली. त्यामुळे राष्ट्रवादी समन्वयाची भूमिका घेतानाच पक्ष कार्यकर्ते दुखावणार नाही याची काळजी घेत आहे. चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्‍यात शेखर निकम प्रभावीपणे काम करत आहेत; गुहागरात राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे मोठे आव्हान आहे. कार्यकर्त्यांना स्थिर ठेवण्यासाठी तेथील कट्‌टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. तीच परिस्थिती रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्‍यात आहे.

हेही वाचा  -  मास्क हनुवटीवर अन् पिचकारी रस्त्यावर !
 

उदय सामंत यांचे तगडे आव्हान आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रत्येक तालुक्‍यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले जावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. एखाद्या गावात पदाधिकारी म्हणून गेलो तर तेथील विकासकामे करण्यासाठी त्यांना काय देणार हा प्रश्‍न आम्हाला पडतो असे कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या दौऱ्याला लाभलेला प्रतिसाद पाहता सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित झाली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT