Jellyfish Crisis In Front Of Fishermen Ratnagiri Marathi News  
कोकण

रत्नागिरी तालुक्यात मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसह वादळसदृश हवामानाने मच्छीमारीला ब्रेक लागला होता. या परिस्थितीतून सावरणाऱ्या रत्नागिरी तालुक्‍यातील मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट आ वासून उभे आहे.

गेले आठवडाभर 10 वावापर्यंत मासेमारी करणारे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या संकटांचा सामना करणाऱ्या मच्छीमारांपुढे सध्या जेलीफिशचे संकट आ वासून उभे राहिले आहे. 

मिऱ्या, काळबादेवी, गणपतीपुळे, जयगड या भागात मोठ्या प्रमाणात जेलीफिश सापडत आहेत. झुंडीने असलेले जेलीफिश माशांवर तुटून पडतात. त्यांच्या भीतीने मासे किनारी भागातून गायब झाले आहेत. जेलीफिश जाळी फाडत असल्याने नुकसाने होते. मतलई वारे सुरू झाल्यामुळे तो किनारी भागाकडे येतो. गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना जेलीफिशची भीती आहे. त्याचा अंगाला स्पर्श झाला तर प्रचंड खाज सुटते. त्यामुळे मासेमारीला जाणे अनेकांनी टाळले होते.

आठ दिवसांपूर्वी म्हाकुळसह 10 ते 15 किलो मासळी जाळ्यात सापडत होती. जेलीफिशने यावर पाणी फेरले. गेले दोन दिवस वाऱ्याची दिशा बदलू लागल्याने जेलीफिशचे संकट कमी होईल, अशी आशा आहे. ते खोल समुद्रात निघून जातील किंवा किनाऱ्यांवरील खडकाळ भागात आपटून फुटून जातील. हे संकट कमी झाले तरच अर्थकारण सुधारेल, अशी आशा मच्छीमार व्यक्‍त करत आहेत. 

दरम्यान, ट्रॉलिंगसह पर्ससिन नेटवाल्यांना 12 वावाच्या पुढे खोल समुद्रात बऱ्यापैकी मासा मिळत आहे. सध्या सरंगा, टायनी कोळंबी, सुरमई, बांगडा चांगल्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे दरही स्थिरावले आहेत. कोळंबी 120 ते 220 रुपये किलो, बांगडा 100 रुपये किलो, सुरमई 350 रुपये किलो तर सरंगा 100 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे. 

मिऱ्या किनाऱ्यावर जेलीफिश आढळू लागल्याने आठवडाभर मच्छीमार मासेमारीसाठी गेलेले नाहीत. गिलनेटने मासेमारी करणारे अडचणीत आले आहेत. 
- श्रीदत्त भुते, मच्छीमार  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT