The journey of Rajapur taluka towards safe zone again  
कोकण

राजापुर तालुक्‍याची वाटचाल पुन्हा सेफ झोनच्या दिशेने...

राजेंद्र बाईत

राजापूर : गेल्या सुमारे दहा दिवसांमध्ये शहरात झपाट्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून त्यांची संख्या तब्बल 21 वर जाऊन पोहचल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये शहरातील नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तालुक्‍याच्या ग्रामीण भागामध्ये सद्यस्थितीमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसताना शहरातील रुग्णांची संख्याही हळूहळू कमी होऊ लागल्याने तालुक्‍याने पुन्हा एकदा सेफ झोनकडे वाटचाल सुरू केल्याचे आशादायक चित्र दिसत आहे. 

जिल्ह्याच्या अन्य तालुक्‍यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असताना राजापूर तालुका सेफ झोनमध्ये होता. सुरवातीचे काही महिने सेफ झोनमध्ये राहिल्यानंतर मे महिन्यामध्ये तालुक्‍यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर गेल्या महिन्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. या कालावधीमध्ये राजापूर शहर सेफ झोनमध्ये होते. मात्र या महिन्यामध्ये शहरामध्ये सुमारे दहा दिवसांच्या कालावधीमध्ये एकामागोमाग एक असे 21 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊजणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरासह राजापूरवासीयांना दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीमध्ये तालुक्‍यातील बारा रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. 

प्रांताधिकारी प्रवीण खाडे, तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय साबळे आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने घेतलेली मेहनत आणि त्याला लोकांसह स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक संस्थांसह तालुकावासीयांनी दिलेल्या सक्षम साथीच्या बळावर पुन्हा एकदा राजापूर तालुक्‍याने सेफ झोनकडे सुरवात केली आहे. 

46 रुग्णांची कोरोनावर मात 
राजापूर तालुक्‍यामध्ये आजपर्यंत 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील 21 तर ग्रामीण भागातील 38 रुग्णांचा समावेश आहे. या एकूण रुग्णांमधील एका रुग्णाचे निधन झाले असून तब्बल 46 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दृष्टिक्षेप 
- दहा दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 21 वर 
- गेल्या तीन दिवसांमध्ये नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह 
- ग्रामीण भागामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही
- सद्यस्थितीमध्ये तालुक्‍यातील 12 रुग्ण कोरोनाग्रस्त 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

SCROLL FOR NEXT