kankavli bhirvande grampanyat win by shiv sena again in sindhudurg 
कोकण

Gram Panchayat Results : कणकवलीत तीन पैकी दोन ग्रामपंचायती शिवसेनेकडे

राजेश सरकारे

कणकवली : कणकवली तालुक्यातील तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीच्या ७ जागांपैकी ६ ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. तर एकमेव जागा शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने जिंकली आहे. यापूर्वी तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे पूर्ण बहुमत होते.  

दरम्यान तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेने तर एका ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व राखले आहे. कणकवली तालुक्यात तीन ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यात गांधीनगर ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

भिरवंडे ग्रामपंचायतीमधील ७ पैकी ४ जागांवर शिवसेना पुरस्कृत उमदेवार बिनविरोध ठरले. तर उर्वरित तीनही जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी ठरले. त्यामुळे तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीच्या निकालावर तालुकावासीयांचे तसेच राजकीय नेतेमंडळींचे लक्ष लागून होते. तोंडवली - बावशी ग्रामपंचायतीमधील सर्व ७ जागांसाठी निवडणुका झाल्या. यात ६ जागांवर भाजप पुरस्कृत तर १ जागा शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने जिंकली आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT