karnatak 25 people Fear of quarantine Fled to the forest 
कोकण

क्वारंटाइनच्या भीतीने कर्नाटकचे २५ हून अधिक प्रवासी राजधानी एक्सप्रेसमधून पळाले जंगलात ; निर्माण झाले भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : दिल्लीकडून मडगावकडे जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसमधून मडूरे रेल्वे स्थानक नजीक कर्नाटकचे २५ हून अधिक प्रवासी उतरुन जंगलात पळाले. पैकी ३ प्रवाशांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले आहे. राजधानी एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी मडूरे स्टेशन नजीक थांबली असता २५ हून अधिक प्रवाशांनी जंगलात पळ काढला. रेल्वे गार्डने याबाबत रेल्वे स्थानकावर माहिती देताच एकच खळबळ उडाली.


 स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तीघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले आहेत. बांदा पोलीसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आपण भटकळ (कर्नाटक) येथील रहिवासी असून दिल्लीला गेलो होतो. मडगाव रेल्वे स्थानकावर क्वारंटाइन होण्याच्या भीतीने आपण मडूरेत उतरल्याचे तीनही प्रवाशांनी सांगितले. घटनास्थळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच भिकाजी केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, प्रकाश गावडे, यशवंत कुबल, सु   दीन गावडे, पोलीस पाटील निर्जरा परब उपस्थित आहेत.


  इतर पळून गेलेल्या प्रवाशांची माहिती मिळाली नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा ८ रुग्ण सापडल्याने या प्रवाशांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT