कोकण

करूळ घाटातून एकेरी वाहतुक सुरू; पुर्नबांधणीचे काम पुर्ण

१२ जुलैपासुन हा घाट मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

वैभववाडी : अतिवृष्टीने खचलेल्या करूळ घाटरस्त्यांच्या पुर्नबांधणीचे काम पुर्ण झाले असून आज सायंकाळी साडेसहा वाजता घाटामार्गावरून एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली. आठ दिवसानंतर पुर्ण क्षमतेने वाहतुक सुरू करण्यात येणार आहे. १२ जुलैपासुन हा घाट मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता.

अतिवृष्टीमुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाटरस्ता १२ जुलैला पहाटे खचला. त्यामुळे वाहतुकीस बंद करण्यात आला. सर्वाधिक वाहतुक असलेला हा घाटमार्ग वाहतुकीस बंद झाल्यामळे दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली. घाटरस्त्या पाठोपाठ पर्यायी भुईबावडा घाटमार्ग भेगा पडल्यामुळे बंद करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने १४ जुलैपासून रस्ता पुर्नबांधणीच्या कामाला सुरूवात केली. काम सुरू केले त्याच दिवशी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी २६ जुलैपर्यत काम पुर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते; परंतु काम सुरू झाल्यानंतर सातत्याने मुसळधार पाऊस सुरू झाला. कामात खंड न पाडता काम सुरू ठेवण्यात आले.

खचलेल्या घाटरस्त्याच्या ठिकाणी कॉक्रींटची भिंत उभारण्याचे काम आज सायंकाळी पाच वाजता पुर्ण झाले. तेथे बॅरिकेटस लावण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने वाहतुकीस हिरवा कंदील दिला. वैभववाडी पोलिसांनी सायंकाळी साडेसहा वाजता या मार्गावरून वाहतुक सुरू केली आहे. आठ दिवसानंतर पुर्ण क्षमतेने या मार्गावरून वाहतुक सुरू करण्यात येणार आहे. १५ दिवस वाहतुकीस बंद असलेला करूळ घाटरस्ता वाहतुकीस खुला झाल्यामुळे दळणवळणाची मोठी गैरसोय दुर झाली आहे.

"सध्या एकेरी वाहतुक सुरू केली आहे. आठ दिवसानंतर पुर्ण क्षमतेने वाहतुक सुरू होईल."

- डी. जी. कुमावत, शाखा अभियंता, महामार्ग प्रधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT