करूळ घाटात ट्रक बंद
करूळ घाटात ट्रक बंद sakal
कोकण

करूळ घाटात ट्रक बंद: 10 तास वाहतुक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : करूळ घाटरस्त्यात सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरच्या सीमेवर रस्त्याच्या मधोमध आज ता.२२ पहाटे चार वाजता पुन्हा ट्रक बंद पडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली. कोल्हापुरच्या दिशेने निघालेली शेकडो वाहने घाटरस्त्यात अडकली.वाहनांची रांगच रांग लागली होती. तब्बल दहा तासानंतर घाटमार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात पोलीसांना यश आले. घाटमार्गातील वाहतुक विस्कळीत होण्याची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

करूळ घाटरस्त्यातील सिंधुदुर्ग जिल्हयाच्या प्रवेशव्दारावरच कोल्हापुरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा ट्रक बंद पडल्यामुळे सुरूवातीला घाटरस्त्याला वाहतुक कमी होती.परंतु तासाभरानंतर वाहनांची संख्या वाढत गेली. ट्रकमुळे वाहतुक काही काळ पुर्णपणे ठप्प झाली. कोल्हापुरच्या दिेशेने जाणारी शेकडो वाहने घाटरस्त्यातच अडकली. घाटरस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.ही माहीती वैभववाडी पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव,पोलीस हवालदार विलास राठोड,संदीप राठोड,आरती राठोड,संतोष शिंदे, कोलते हे घटनास्थळी पोहोचले.

दाट धुके आणि घाटातील वाहनांतुन वाट काढत जाताना पोलीसांची देखील दमछाक झाली.पोलीसांनी तत्काळ एडगाव तिठा आणि गगनबावडा येथे वाहतुक थांबवुन हलक्या वाहनांची वाहतुक भुईबावडा घाटमार्गे वळविली.तर वैभववाडीकडुन कोल्हापुरच्या दिशेने जाणारी अवजड वाहने फोंडाघाट मार्गे वळविली.त्यानंतर घाटात अडकलेली वाहने टप्पाटप्प्याने सोडण्यास सुरूवात करण्यात आली.

करूळ जामदारवाडी,एडगावपर्यत मोठ्या प्रमाणात वाहने थांबली होती.दुपारी एक वाजता घाटमार्गात अडकलेल्या वाहनांना मार्गस्थ करण्यात पोलीसांना यश आले.दरम्यान घाटमार्गात पोलीस थांबलेले असुन वाहतुकीचा खोळंबा होणार नाही अशा पध्दतीने वाहने सोडली जात आहेत.ट्रक दुरूस्तीचे काम देखील सुरू आहे. करूळ घाटरस्त्यात ट्रक बंद पडुन वाहतुक ठप्प आणि विस्कळीत होण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या निधनाची पसरवली खोटी बातमी, जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

T20 World Cupमध्ये कॅरिबियन तडाखा! निकोलस पूरनचा 'अग्नि तांडव', एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 36 धावा, Video Viral

Women’s Health : शारिरीक तंदूरूस्तीसाठी महिलांनी तिशीनंतर 'या' सुपरफूड्सचा आहारात करावा समावेश

'रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव, त्या सतत TV वर दिसायच्या म्हणून..'; बच्चू कडूंचा खबळजनक दावा

Share Market Today: शेअर बाजारात जोरदार सुरुवात होण्याची शक्यता; कोणत्या शेअर्सवर ठेवा लक्ष?

SCROLL FOR NEXT