Keep a suicide note The extreme role of fasting fishermen 
कोकण

आत्महत्या करतो अशी चिठ्ठी ठेवू़; उपोषणकर्ते मच्छीमारांची टोकाची भुमिका

सकाळवृत्तसेवा

हर्णै ( रत्नागिरी) - एल. ई. डी. व फास्टर नौकांच्या अवैध मासेमारीमुळे आम्हा मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. ही मासेमारी बंद झालीच पाहिजे. आम्ही जगायचं कसं ? बॅंकांचे कर्ज कस भरायचं ? दुसरा उद्योग आम्हाला माहीत नाही. ही मासेमारी नाही झाली तर सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळे आम्ही इथेच आत्महत्या करत आहोत, अशी एक चिठ्ठी लिहुन ठेवू. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आमच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार राहील, अशी टोकाची भावना येथील मासळी विक्री करणाऱ्या जयश्री दोरकुळकर यांनी व्यक्त केली. 

कोकण किनारपटटीवर साधारपणे 80 टक्के नौका बंदरामध्ये व खाडयांमध्ये नांगरुन ठेवल्या आहेत. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली असून उद्योग न करण्याचा निर्णय येथील बहुतांशी तरुण वर्ग घेत असून मच्छीमारांचे बेमुदत उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.एल.ई.डी. व फास्टर नौकांच्या अवैध मासेमारी विरोधात हा जोरदार लढा आम्ही सुरू केला आहे. ही मासेमारी बंद करण्यासाठी आम्ही रत्नागिरीपर्यंत जेलभरो आंदोलन केले.

स्वतः खटले झेलले. दिल्लीपर्यंत जाऊन या मासेमारी विरोधात बंदीचा कायदा करून घेतला. तरीही या कायद्याची अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे तातडीने अंमलबजावणी करावी तसेच आतापर्यंत आम्हाला तोंडीच आश्वासने मिळाली आहेत. जोपर्यंत मासेमारीवर कडक कारवाई करण्याचे मत्स्यखात्याचे मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचे लेखी पत्र आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असे दापोली मंडणगड गुहागर मच्छीमार संघर्ष समितीचे सदस्य महेंद्र चोगले यांनी ठामपणे सांगितले. 

तीन ते चार वर्षे धुमाकळच 
हर्णे बंदरातील बर्फविक्रेते महेंद्र पावसे यांनी सांगितले की, हर्णे बंदरामध्ये बर्फविक्रीचा उद्योग आहे. याआधी हा व्यवसाय खूप सुरळीत चालू होता. परंतु गेली तीन ते चार वर्षे एल.ई.डी व फास्टर नौकांच्या मासेमारीने धुमाकळच घातला आहे. त्यामुळे बंदरातील मच्छिमारांना मासळीचा मिळेनाशी झाली आहे यामुळे आमचा बर्फविक्रीचा व्यवसाय देखील अडचणीत आला आहे, शासनाने यावर तातडीने उपाय करावेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT