Sanju Parab sakal
कोकण

सावंतवाडी : केसरकरांना अधिकार्‍यांकडून किंमत नाही

संजू परब: वक्तव्य करण्यापूर्वी अभ्यास करावा

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : कबुलायतदार गावकर प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कोकण आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आपल्याला आमंत्रण दिले नसल्याचे सांगत अधिकारी आपल्याला किंमत देत नाहीत याची अप्रत्यक्ष कबुली आमदार दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा दिली आहे. याच रागातून संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचे वक्तव्य त्यांनी केले ;मात्र कोकण आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांची कोणीही भेट घेत चर्चा करू शकते. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आधी अभ्यास करावा व नंतर बोलावे अशी टिका भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली.

आमदार केसरकर यांना ज्याप्रमाणे शिवसेनेत किंमत नाही त्याचप्रमाणे प्रशासनातही राहिली नाही असेही ते म्हणाले. केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेत कबुलायतदार प्रश्नावर अधिकार्‍यांनी परस्पर बैठक घेतल्याबाबत संताप व्यक्त केला होता.या पाश्र्वभूमीवर येथील संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, अमित परब आदी उपस्थित होते. श्री परब पुढे म्हणाले," मडुरा पुलासंदर्भात मी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे निवेदने सादर केली होती; मात्र माझा गाव असल्याने आमदार केसरकर यांनी या पुलासाठी निधी देण्यास वेळोवेळी आडकाठी केली.

त्यानंतर१५ ऑक्टोबर २०२१ ला मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी मेपर्यंत या पूलाच्या मंजूरीचे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर हे पूल मंजूर झाले असून त्यात संजना सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे .केसरकरांनी फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये .जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असतो हे केसरकर विसरले असतील. त्यामुळे त्यांनी अशी लुडबुड करण्यापेक्षा तालुक्यातील अनेक रस्ते व पुले नादुरुस्त झाली आहेत त्यासाठी प्रयत्न करावेत."

ते म्हणाले, " मुळात आमदार केसरकर यांची आता काहीच ताकद राहिली नाही .विधानसभा निवडणुकीत ते थोडक्यात निवडून आले .जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही आम्हीच वरचढ ठरलो .आता तर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडे सर्व जागावर उभे करण्यासाठी उमेदवारही सापडत नाहीत अशी परिस्थिती झाली आमचे खरकाटे देखील ते उचलतील यात कोणती शंका नाही.जागा लढण्यासाठी सेनेकडेच नाहीत तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडे सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी उमेदवार नाहीत.त्यामुळे त्यांना आघाडी करून लढण्याची भाषा करावी लागत आहे ."

कॅनडाचे शिष्टमंडळ २८ मार्चला भारतात येत आहे या शिष्टमंडळासोबत येत्या १ एप्रिलला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आपण स्वतः चर्चेला असणारअसून ही चर्चा दिल्लीत होणार आहे तसेच कॅनडाची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी भारतात होत असून ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल असे आमदार केसरकर यांनी म्हटले होते; मात्र केंद्रात भाजपचे सरकार असून या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी आमचे नेते सक्षमआहेत. केसरकरांनी लोकांना वेड बनवण्याचे आता तरी थांबवावे असे श्री परब म्हणाले.

ते म्हणाले," मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदिर समोर होत असलेल्या सेल्फी पॉइंटचा ठराव आम्ही सर्वानुमते घेतला होता .यात शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील सहमती दर्शविली होती .त्यामुळे तो बदलण्याचा अधिकार आमदार किंवा मुख्याधिकाऱ्यांना नाही. आता त्या ठिकाणी मापे घेतल्याचे नाटक करत त्याला आपणच मंजुरी दिल्याचे ते भासवत आहेत .बॅरिस्टर नाथ पै सभागृह भाजीमंडईबाबतही ते लोकांची दिशाभूल करत आहेत. संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच कोटी मंजूर झाले होते .त्याचा प्रस्ताव आम्ही केल्याचे सर्वश्रुत आहे .त्यामूळे १ कोटी ४० लाख कधी आले याची मी नक्कीच मुख्याधिकाऱ्यांकडून माहिती घेईन .आगामी निवडणुकीमुळे केसरकर हतबल झाले असून खोटे बोला पण रेटून बोला असे सुरू आहे."

तेलींशी दुराव्याचा प्रश्नच येत नाही

संजू परब व राजन तेली यांच्यात दुरावा आहे का असे विचारले असता श्री परब म्हणाले ,"भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली हे आमचे नेते आहेत .त्यांचा सल्ला आमच्यासाठी आदेश असतो त्यांचे व माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत मी व माझ्या सहकार्‍यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नोटीस आपल्याला आली नाही. कबुलायतदार गावकर प्रश्नी झालेल्या आंदोलनात आम्ही एकत्रच होतो. त्यामुळे उगाच आमच्यात भांडण लावण्याचे काम कोणी करू नये."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत एवढ्या वेगाने घरे का विकत घेत आहेत? प्रॉपर्टी मार्केटने मोडले सर्व रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : पुण्यातील नव्याने झालेला सिंहगड रोड वरचा उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडण्यात येणार

MLA Amol Khatal: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा महाविजय निश्चित : आमदार अमोल खताळ; विकासाची गती तीन पटीने वाढली

Balasaheb Thorat : ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात: बाळासाहेब थोरात; आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम !

स्मृती मंधाना अन् पालाश मुच्छलचा विवाह ७ डिसेंबरला होणार? कुटुंबातील सदस्याने दिली महत्त्वाची अपडेट...

SCROLL FOR NEXT