खारेपाटणला महामार्गालगतची कामे अपूर्ण sakal
कोकण

खारेपाटणला महामार्गालगतची कामे अपूर्ण

स्थानिक संतप्त; आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झाले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी खारेपाटण येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिला आहे.

खारेपाटण येथील महामार्ग प्राधिकरण उपविभाग कार्यालयातील सहायक अभियंता बी. जी. कुमावत यांना तसे निवेदन देण्यात आले.यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, योगेश पाटणकर,उज्वला चिके, रीना ब्रम्हदंडे, सोनल लोकरे,आरती कर्ले आदी उपस्थित होते.

खारेपाटण शहरातून मुंबई - गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गावर खारेपाटणमधील काही ठिकाणी बसथांबे बांधलेले नाहीत. खारेपाटण बॉक्सवेल येथील दोन्ही बाजूकडील सेवारस्त्यावर वाहन चालकासाठी बसविलेले बर्हिवक्र आरसे हे लहान आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे मोठे आरसे बसविणे गरजेचे आहे. तसेच खारेपाटण महामार्गावरून ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा रस्ता खोदकामानंतर बनवून देण्यात येणार होता. तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने रोलिंग लावण्यात येणार होते. ही दोन्ही कामे सध्या अपूर्ण आहेत. तसेच खारेपाटण बॉक्सवेलच्या बाजूने बांधलेली गटारे ही अर्धवट आहेत. रामेश्वरनगर खारेपाटण येथील मुख्य रस्त्यावर प्राथमिक आरोग्‍य केंद्राकडे गेलेला जुना हायवे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून त्याचा येथील नागरिकांना त्रास होत आहे.

इतर काही मागण्या

खारेपाटण येथे महामार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच अपघात ठिकाणे दर्शविणारे फलक नाहीत. हायमास्ट दिवे अद्याप चालू नाहीत यामुळे या परिसरात सर्वत्र काळोख असतो. तसेच महामार्गावरून खारेपाटणला दोन्ही बाजूने जोडणाऱ्या सेवारस्त्याची कामे अपूर्ण असून खारेपाटण संभाजीनगर व खारेपाटण येथून चिंचवलीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याच्या कामाबाबतही संबंधितांचे लक्ष वेधण्याचे निवेदनात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT