khed sakal
कोकण

खेड: भाजपा कार्यालयातील बॅनर युवासैनिकांनी फाडले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर आज दुपारी तीन युवासैनिकांनी फाडल्याने खेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

गोविंद राठोड

खेड : खेड शहर भाजप कार्यालयातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर आज दुपारी तीन युवासैनिकांनी फाडल्याने खेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी नगराध्यक्ष आबा जोशी यांच्या समोरच ही घटना घडली. युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे हे त्यांच्या दोन साथीदारांसह कार्यालयासमोर आले आणि कार्यालयातील महिला कर्मचारी यांच्याबरोबर जोरजोराने वाद घालू लागले व त्याच वेळेस त्यांनी तेथील बॅनर फाडले व लगेच तेथून त्यांच्या दुचाकीने निघून गेले.

थोड्या वेळातच शहरअध्यक्ष अनिकेत कानडे तेथे आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ भाजपच्या वरिष्ठांशी संपर्क साधून पुढे काय करायचे याबाबत निर्णय घेतला. जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार रेकॉर्ड झाला आहे. त्या दृष्टीने खेड पोलिस तपास करत आहेत. सायंकाळी खेड पोलिस ठाण्यात बॅनर फाडणाऱ्याच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवण्यात आली आहे. दुपारी अचानक झालेल्या या प्रकारामुळे खेड पोलिस भाजपच्या कार्यालयाजवळ पहारा देत आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा राग ठेवून या युवासैनिकांनी हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. कारण खेड येथे या सुवासैनिकांनी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळेला भाजपचे शहरअध्यक्ष अनिकेत कानडे आणि युवासैनिकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आठ दिवसानंतर हा प्रकार झाल्याने तर्क वितर्क लढवले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT