khed tehsil in konkan 88 villages not in corona till date but common area are spread a corona 
कोकण

खेड तालुक्‍यात कोरोना अजूनही 88 गावांच्या वेशीबाहेरच

सकाळ वृत्तसेवा

खेड : तालुक्‍यातील 183 गावांपैकी 95 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 88 गावांना अद्यापही कोरोनाला आपल्या वेशीबाहेरच थांबविण्यात यश मिळाले आहे. तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रानिहाय आकडेवारी मध्ये सर्वात कमी रुग्णांची संख्या वावे प्राथमिक केंद्रातील 17 गावांत दिसून येते. या केंद्रांतर्गत आतापर्यंत 31 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
 
वावे केंद्रांतर्गत येणाऱ्या 17 गावांची लोकसंख्या 9, 385 असून यातील 0. 33 टक्के नागरिक कोरोना संक्रमित झाले आहेत. ग्रामीण भागात सर्वात जास्त रुग्ण लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेत. या केंद्रांतर्गत 22 गाव असून आतापर्यंत 320 रुग्ण सापडले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत 1.37 टक्के रुग्णांना संसर्ग झाल्याचे दिसून येते. आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील 32 गावांतून 165 रुग्ण आढळले आहेत. फुरुस आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत 124 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत तर शिव बु आरोग्य केंद्रातील 17 गावात 117 रुग्ण आढळले आहेत. 

तिसंगी आरोग्य केंद्रातील 18 गावात 106 बाधित रुग्ण आढळून आले तर तळे व कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अनुक्रमे 57 व 40 रुग्ण मिळाले. बाधित 95 गावांमध्येही कोरोनाचा शिरकाव हा दुसऱ्या शहरातून किंवा बाधित भागातून आलेल्या व्यक्तींमुळेच झाला आहे. आतापर्यंत आढळलेल्या 1,222 रुग्णांमध्ये 262 रुग्ण हे खेड शहर भागातील आहेत. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात 0.65 टक्के रुग्ण संक्रमित झाले. आजही ग्रामीण भाग सुरक्षित मानला जात आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामीण भागात सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. 

तीस हजार चाकरमानी परतले 

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात परजिल्ह्यातून जवळपास तीस हजारपेक्षा अधिक चाकरमानी तालुक्‍यात मूळ गावी परतले. अनेक गावांनी अशा लोकांना गावाबाहेर प्राथमिक शाळा, समाजमंदिर अशा ठिकाणी क्वॉरंटाईन केले. दक्षता शेवटपर्यंत ठेवल्याने ग्रामीण भागात मोठा प्रादुर्भाव झाला नाही. गणेशोत्सवात चाकरमानी 14 दिवस अगोदरच येऊन क्वॉरंटाईन झाल्यामुळे रुग्णसंख्या मर्यादित झाली. 
 
दृष्टिक्षेपात

- 183 गावांपैकी 95 गावांत कोरोना 
- शहरातून किंवा बाधित भागातून आल्याने शिरकाव 
- तीस हजारपेक्षा अधिक चाकरमानी तालुक्‍यात परतले 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

SCROLL FOR NEXT