Khingini Gram Panchayat tap water scheme sakal
कोकण

डोक्यावरील हंडा उतरला; पायपीटही थांबली!

खिणगिणी ग्रामपंचायतीची नळपाणी योजना लाभदायी; घरोघरी पाणी

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : खिणगिणी गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खरोखरचा उतरला आहे. येथे पाणी योजना सुरू झाली असून पाण्यासाठी होणारी येथील महिलांची दीड कि.मी.ची पायपीट थांबली आहे. आता घरोघरी पाणी येणार आहे.तालुक्यातील खिणगिणी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी वैभव कोकरे यांचा पुढाकार आणि पाठपुराव्यातून खिणगिणी ग्रामपंचायतीद्वारे धनगरवाडीसाठी नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. या माध्यमातून खिणगिणी धनगरवाडीतील महिलांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण असलेली सुमारे दीड-दोन किमी पायपीट आता थांबणार आहे. एवढेच नव्हे तर येथील घरांमध्ये नळजोडणी देण्यात येणार आहे.

दरम्यान, धनगरवाडीतील महिलांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी वर्षानुवर्षे सुरू असलेली भटकंती थांबविण्याचा निर्धार ग्रामपंचायत सदस्य कोकरे यांनी निवडणुकीच्या दरम्यान केला होता. त्याप्रमाणे त्यांनी धनगरवाडीची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी आवश्यक असलेल्या नळपाणी योजनेला मंजुरी देणे, निधी उपलब्ध करणे आदींसाठी सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावाही केला. त्यासाठी त्यांना सरपंच मानसी कदम, उपसरपंच दिवाळे, ग्रामपंचायत सदस्य, मनोज कदम, वाडीतील ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या साऱ्‍यांच्या प्रयत्नांना यश येऊन धनगरवाडीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा करणाऱ्‍या नळपाणी योजनेचे काम मार्गी लागले आहे. पाणी योजनेच्या माध्यमातून धनगरवाडीतील महिलांना आता हक्काचे आणि हमखास पाणी मिळत असून वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्‍या पाण्याच्या समस्येतून त्यांची आता सुटका झाली आहे.

रोजगारासाठी न जाता, पाण्यासाठी भटकंती..

तालुक्यातील खिणगिणी येथे धनगरवाडी वसलेली आहे. या वाडीला गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत असून पाण्यासाठी वणवण करावी लागते. एप्रिल-मे महिन्यातील टंचाई काळात येथील महिलांसह ग्रामस्थांना रोजगारासाठी न जाता, पाण्यासाठी दिवसभराचा कालावधी व्यतीत करावा लागत होता. ही समस्या संपुष्टात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT