pune.jpg
pune.jpg 
कोकण

पालकमंत्र्यांच्या दणक्याने खोडाळा वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : नवनिर्वाचित पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आदिवासी भागात किती पोहोचल्यात व रखडल्यात, यासाठी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी मोखाड्यातील आढावा बैठकीत गेली दोन वर्षापासून खोडाळा वीज उपकेंद्र सरकारी बाबूंमुळे लालफितीत अडकल्याचे भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांनी समोर आणले. त्यावेळी तातडीने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश, चव्हाण यांनी मोखाडा तहसीलदारांना दिले.

गेली सहा महिने वीज उपकेंद्राचा जागेचा रखडलेला सात-बारा अवघ्या तासाभरात झाला. त्यामुळे खोडाळा वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 'पालकमंत्री असावा तर असा' अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. यामुळे आता लवकरच खोडाळा वासीयांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे.   

मोखाडा तालुक्यात मोखाडा आणि खोडाळा असे प्रशासकिय दोन विभाग आहेत. मोखाडा मुख्यालया पासून तब्बल 20 किमीहून अधिक अंतर कापुन खोडाळा जावे लागते. यामुळे तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागाचा उपविभाग खोडाळा येथे आहे. मात्र महत्वाचे वीज मंडळाचे ऊपकेंद्र याठिकाणी नव्हते. यामुळे मोखाड्याहुन विद्युत वाहक करून खोडाळा आणि त्यापलीकडे तब्बल 13 किमी पर्यंतच्या  25 ते 30  गावपाड्यांना वीज पुरवली जात होती. यामुळे सततचा खंडित विज पुरवठा, जुन्या तारा, वाकलेले पोल, कमी दाबाची वीज अशा असंख्य अडचणीने खोडाळा परिसर हैराण झाला आहे. याबाबत खोडाळ्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र द्यावे अशी मागणी होती. हे केद्र मंजूरही झाले होते मात्र, कायदेशीर कचाट्यात ते दोन वर्षापासून लालफीतीत अडकलेले असल्याने अद्याप पर्यंत होवू शकलेले नव्हते. 

मोखाड्यात अतिवृष्टीमुळे मोखाडा 
त्र्यंबकेश्वर दरम्यान मोरचोंडी येथील पुलाजवळ रस्ता वाहुन गेला होता. सदरच्या ठिकाणी भरावं करून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याचा प्राथमिक अंदाज बांधकाम विभागाने वर्तवला होता. मात्र, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दोन दिवसांत काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिवस रात्र मोरचोंडी येथे भरावाचे काम करून, बांधकाम विभागाने  मोखाडा  - त्र्यंबकेश्वर हा रस्ता तिसऱ्याच दिवशी वाहतुकीस खुला केला आहे. येथे चव्हाण यांची कार्यतत्परता दिसून आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT