Know More About Angling Fishing Ratnagiri Marathi News  
कोकण

अँगलिंग फिशिंग म्हणजे काय ? जाणून घेण्यासाठी वाचा

सकाळवृत्तसेवा

गुहागर ( रत्नागिरी ) - पावसाळ्यात मासेमारी बंद असताना नदी-नाले तुडुंब वाहू लागले की, काठीला तंगूस आणि आकडा (इंग्रजी जे आकाराचा) लावून मासेमारी केली जाते. त्यालाच अँगलिंग फिशिंग (मासे गरवणे) म्हणतात. अशा मासेमारीसाठी विशिष्ट पद्धतीचे रॉड व अन्य साधने रत्नागिरी जिल्ह्यातही उपलब्ध होऊ लागली आहेत. 

अँगलिंगने मासेमारीची संकल्पना आपल्याकडे तीन-चार वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यावेळी काही निवडक लोक अँगलिंगसाठी येत असत. आज रत्नागिरी जिल्ह्यात अँगलिंग करणाऱ्यांची संख्या तीनेशे ते पाचशेच्या घरात आहेत. त्यांच्याकडे मासेमारीसाठी असलेला रॉड व वेगवेगळे हूक हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतो. 

अँगलिंगसाठी लवचिक पण न मोडणारा धातूचा रॉड, गळाला मासा लागल्यावर दोर ओढण्यासाठीचे आधुनिक रीळ, न तुटणारा दोरा (फिशिंग लाइन) आणि मासे पकडण्यासाठी लुआर किंवा बेट फिशिंगचे हूक विक्रीसाठी ठेवणारी दुकानेही जिल्ह्यात आहेत. या सामुग्रीची किंमत 1500 ते 1 लाखापर्यंत असते. आपल्याकडे बेट हुकने मासेमारी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जे छंद म्हणून अँगलिंगकडे पाहतात, ते लुआर हुकचा उपयोग करतात. बेट हूक छोटा व जे आकाराचा असतो. त्यावर लावलेले खाद्य गिळताना बेट हूक थेट माशाच्या पोटात जातो. हा हूक बाहेर काढण्यासाठी मासा ओकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बेट हूक माशाच्या आतड्यात अडकतो. याउलट लुआर हूक आकाराने मोठा आणि गोल असतो. तो माशाच्या तोंडातच अडकतो. त्यामुळे लुआर हुकने इजा झाली तरी ती चटकन बरी होते. 

छंद म्हणून होणाऱ्या मासेमारीत पकडलेल्या माशाला हात लावणे निषिद्ध मानले जाते. निसर्गत: माशांच्या अंगावर एक गुळगुळीत थर असतो. हा थर माशांचे बॅक्‍टेरिया व अन्य जंतूंपासून संरक्षण करतो. त्यामुळे लुआर हूक माशांच्या तोंडातून काढण्यासाठी विशिष्ट आकाराची स्वतंत्र पकड वापरली जाते. 

छंद म्हणून किंवा खेळ म्हणून.. 
अँगलिंग फिशिंगसाठी प्रचंड संयमाची आवश्‍यकता असते. अनेक वेळा एखादा मासा पकडण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन तास वाट पाहावी लागते. त्यामुळे परदेशात अँगलिंग फिशिंगकडे छंद म्हणून किंवा खेळ म्हणून पाहिले जाते. 

अँगलिंग रॉडला आपल्याकडे इंग्लिश काठी बोलतात. या काठीची वजन उचलण्याची क्षमताही वेगवेगळी असते. दोऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचे हूक लावले जातात. प्रत्येक हुकला वेगळा वास असल्याने अडकणारा मासा वेगळ्या जातीचा असतो. 
-शिवाजी सैतवडेकर, अंजनवेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT