kokan Black Panther appeared Video goes viral from villagers Forest department install cameras 
कोकण

कोकणात बगीरा’ अर्थात ‘ब्लॅक पॅन्थर’चे झाले दर्शन...कोणत्या ठिकाणी वाचा...

राजेश शेळके

रत्नागिरी : दुर्मिळ वन्य प्राण्यांपैकी एक आणि वेगळ्या रुबाबाचा ‘बगीरा’ अर्थात ब्लॅक पॅन्थरचे (बिबट्या) आज संगमेश्‍वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दर्शन झाले. आज सकाळीच या भागात त्याचा वावर असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर शेअर केला. वन विभागाने त्याला दुजोरा दिला. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच तेथे कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.


‘जंगल बुक‘चित्रपटामधील बगिरामुळे ब्लॅक पॅन्थर म्हणजे काय हे सर्वश्रुत झाले आहे. जिल्ह्यात त्याचे वास्तव्य म्हणजे वन विभागाला आणि जिल्हावासीयांना अप्रूपच. पट्टेरी वाघाबाबतही यापूर्वी चर्चा सुरू होती. मात्र वन विभागाने ती अफवा असल्याचे सांगितले. चांदोली अभय अरण्यात पट्टेरी वाघ आहे, परंतु जिल्ह्यात नाहीत. ब्लॅक पॅन्थरबाबतही तसेच होते. जिल्ह्यात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जंगलातील त्यांचा अधिवास कमी होऊन ते मानवी वस्तिमध्ये शिरत असल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात पाहायला मिळतात. ब्लॅक पॅन्थर ही बिबट्याची जात आहे. मात्र त्याचा रंग पूर्ण काळा म्हणून तो विशेष आणि दुर्मिळ आहे. यापूर्वी राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅन्थरला जीवदान देण्यात आले होते.

व्हिडिओ ग्रामस्थांकडून व्हायरल ; वनविभाग लावणार कॅमेरे​

त्यानंतर गुहागरमध्ये एका ब्लॅक पॅन्थरचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. आता संगमेश्‍वर तालुक्यात बगिराचा वाढता वावर चर्चेचा विषय बनला आहे. आज सकाळीच कोंडीवरे येथील जंगलात ब्लॅक पॅन्थचे अनेकांना दर्शन झाले. ग्रामस्थांनी त्याचा व्हिडिओ केला असून तो वन विभाग आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत रत्नागिरी वन अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. गुहागर, राजापूरनंतर आता संगमेश्‍वर तालुक्यातही ब्लॅक पॅन्थर आढळून आला ही पर्यावरणप्रेमीना आनंदाची बाब आहे.

हेही वाचा-उल्लेखनीय! कणकवली तालुक्यात आता गोरगरिबांना मोठा आधार -
..
कोंडीवरे (ता. संगमेश्‍व) येथे आज ब्लॅक पॅन्थरचे दर्शन झाल्याची माहिती खरी आहे. त्या भागात त्याचा वावर असल्याची माहिती होती. त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी लवकच तेथे कॅमेरे लावण्यात येणार आहेत.  
प्रियांका लगड, रत्नागिरी परिक्षत्र वन अधिकारी

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT