पावसामुळे मच्छीमारांची धावपळ Sakal
कोकण

पावसामुळे मच्छीमारांची धावपळ; सुरक्षिततेसाठी घेतला खाड्यांचा आसरा

नौका आंजर्ले, दाभोळ आणि जयगड बंदरात हलवाव्या लागल्या.

राधेश लिंगायत

हर्णे : पुन्हा एकदा मच्छीमारांची धावपळ उडाली. आणि नौका आंजर्ले, दाभोळ आणि जयगड खाडीत हलवाव्या लागल्या. पंधरा दिवस देखील झाले नसतील पुन्हा मुसळधार पाऊस जोरदार वाऱ्यामुळे मासेमारी उद्योगावर कुऱ्हाडच बसली आहे. अशा वारंवार बिघडणाऱ्या वातावरणामुळे मच्छीमारांचे खूप नुकसान होत आहे.

सुरुवाती पासूनचा मासळी हंगाम दुष्काळातच गेला. सप्टेंबर महिन्यात मासळीची आवकच कमी होती. तर ऑक्टोबर महिन्यात फिशमीलने जोर धरला होता. आणि नोव्हेंबरमध्ये तर मासळी मिळत होती पण दर नव्हता तर या महिन्याच्या शेवटी वादळी वातावरणामुळे या उद्योगावर संक्रांतच आली होती. त्यात छोट्या नौकांना मासळीची आवक होती. मोठ्या ट्रॉलर नौका नुकसनातच होत्या. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून चांगल्या प्रकारची बंपर मासळी मिळू लागली होती. परंतु त्या मासळीला दरच मिळत नव्हता. पर्यटनामुळे जरा कुठे या उद्योगाला तेजी आली होती तर वादळाने तोंड वर काढले. गेल्या महिन्यात साधारण १६ तारखेपासून सतत पाच ते सहा दिवस म्हणजे २२ ते २३ तारखेपर्यंत वादळसदृश्य परिस्थिती होती. त्यावेळीही मासेमारी बंद होती. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल थांबली होती.

आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा वादळाचा तडाखा बसला आहे. यामुळे नुकत्याच मासेमारीकरिता आलेल्या सुमारे ५०० ते ६०० नौकांनी जवळपास असलेल्या खाडीत आसरा घेतला आहे. जयगड खाडी जवळ असलेल्यांनी जयगड तर दाभोळ जवळ मासेमारी करत असलेल्या नौकांनी दाभोळ तर हर्णे बंदरात आणि आंजर्ले जवळपास असलेल्या नौकांनी आंजर्ले खाडीत आसरा घेतला आहे. मुसळधार पाऊस वादळवारा होणार असा संदेश हवामान खात्याकडून मिळताच हर्णे बंदरातील नौकामालकांनी आपल्या नौका सुरक्षिततेसाठी काल सायंकाळीच आंजर्ले खाडीत नेल्या आहेत.पुढील चार दिवस सतत असच वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याकडून समजले असल्याने नौका वातावरण शांत होईपर्यंत खाडीतच राहतील असे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले.

वारंवार अशा वातावरणामुळे मासेमारी उद्योग करणं कठीण झालं आहे. आलं वादळ की हलवा बोटी की आम्ही आंजर्ले , दाभोळ, किंवा जयगड नाहीतर दिघी खाडी असो जिथे कुठली जवळ खाडी असेल तिथे धाव घेतो तेच आज हर्णे बंदराची सुसज्ज जेटी झाली असती तर ही फरफट आम्हा मच्छीमारांची उडाली नसती. सरकार आम्हा मच्छीमारांकडे केंव्हा लक्ष देणार? अजून चार दिवस हे वातावरण असच राहणार आहे असा हवामान खात्याकडूनच संदेश आला आहे ; असे ओंकार मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष श्री हरेश कुलाबकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT