कोकण

दरीत कोसळलेली मोटार झाडात अडकली़, कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

राजेश सरकारे

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील फोंडाघाटात शुक्रवारी चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दरीत कोसळली. सुदैवाने ती झाडात अडकल्याने मोठ्या अपघातामधून पती-पत्नी बचावले. सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. अपघातानंतर पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन दाम्पत्याला मोटारीबाहेर काढले. 

कोल्हापूर मंगळवारपेठ येथील प्रदीप करढोणे (62), पत्नी स्वाती (55) यांच्या समवेत फोंडाघाट ते कोल्हापूर, असा मोटारीने (एमएच-09- एफएस-0560) प्रवास करत होते. फोंडाघाटात भालेकर यांच्या हॉटेलपुढे सुमारे दीड किलोमीटरवरील वळणाचा अंदाज न आल्याने मोटार दरीत कोसळली. ती दहा फूट खोलीवरील झाडात अडकल्याने खोल दरीत जाण्यापासून बचावली. मोटारीचे दरवाजे लॉक झाल्याने आत दाम्पत्य अडकून पडले होते. घाटमार्गातून जाणाऱ्या वाहन चालकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. 
अपघाताचे वृत्त समजल्यानंतर पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर घाटमार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या दाम्पत्याला बाहेर आणले. अपघातानंतर एअरबॅग्स उघडल्या गेल्याने दाम्पत्याला फारशा दुखापती झाली नाहीत. 

पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, सहायक उपनिरीक्षक विनायक चव्हाण, राजू उबाळे, राहुल तळसकर, फोंडाघाट चौकीचे हवालदार उत्तम वंजारी यांच्यासह निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

करढोणेने दाम्पत्यावर फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार झाले. मोटार चालक आणि सहप्रवाशांनी प्रवास करताना कायम सिटबेल्ट बांधावा, असे आवाहन मुल्ला यांनी केले आहे. 

मोटारीच्या काचा फोडून सुटका 
फोंडाघाट येथील दरीत मोटार कोसळल्याची माहिती मिळताच फोंडाघाट येथील पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर करढोणे दाम्पत्य मोटारीमध्येच अडकून पडले होते. राऊळ यांनी घाटातून जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांना थांबवले. त्यांची मदत घेऊन ते दरीत उतरले. अपघातात दोन्ही दरवाजे लॉक झाल्याने त्यांनी करढोण दाम्पत्याला मोटारीच्या काचा फोडून बाहेर काढले. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT