Konkan Agricultural University Convocation kokan marathi news 
कोकण

कोकण कृषी विद्यापीठात तब्बल एवढे विद्यार्थी घेणार पदवी... 

सकाळ वृत्तसेवा

दापोली (रत्नागिरी)  : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 38 वा दीक्षांत समारंभ रविवारी (ता. 16) सकाळी 11 वाजता कृषी विद्यापीठाच्या विजय क्रीडासंकुलात राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे.

कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे, पालकमंत्री अनिल परब, कुलगुरू डॉ. संजय सावंत, विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य, माजी कुलगुरू आदी उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभात 3 हजार 524 पदवीकांक्षी स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येईल. त्यामध्ये 63 आचार्य (पीएच.डी.), 317 पदव्युत्तर पदवी, 3 हजार 144 पदवी प्राप्त स्नातकांचा समावेश आहे. पदवीदान समारंभासाठी 1 हजार 563 पदवीकांक्षी स्नातक पदवी ग्रहण करणार आहेत.

राज्यपाल कोश्‍यारी स्नातकांना संबोधित करणार

सन 2017 -18 व 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 29 स्नातकांना विद्यापीठ सुवर्णपदके, 20 स्नातकांना खासगी संस्था पुरस्कृत विविध सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी स्नातकांना संबोधित करणार आहेत. पदवीदान समारंभाच्या निमित्ताने विजय क्रीडा संकुलामध्ये विद्यापीठाने आजवर केलेल्या संशोधनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये कोकणातील विविध फळे, पिके, जनावरे, कृषी अवजारे, मत्स्य यातील तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Video: लक्ष्मण हाकेंचा राईट हँड मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; भेटीचं नेमकं कारण काय?

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात मुक्त शिक्षण व्यवस्था राबवणार, शिक्षण विभागाचा नवा प्लॅन, नेमकी योजना काय?

डान्स टीचरची दहावीच्या विद्यार्थ्याकडे भलतीच मागणी, ब्लॅकमेलला मुलगा कंटाळला; झुडपात नेऊन संपवलं, पोलिसांपासून ५६ दिवस कसा वाचला?

Latest Marathi Update : कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी

महिनाभर दररोज योगा केल्यास शरीरात दिसतात 'हे' आश्चर्यकारक बदल; तज्ज्ञांनी सांगितले 7 मोठे फायदे!

SCROLL FOR NEXT