bridge work completed sakal
कोकण

कोकण : खारेपाटण पुलाचे काम अखेर पूर्णत्‍वास

आठ वर्षांची प्रतीक्षा : पावसाळ्यापूर्वी वाहतूक, वीस कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील सूखनदीवरील पुलाचे काम पूर्णत्‍वास गेले आहे. चार लेनच्या या पुलाचे काम गेली आठ वर्षे विविध कारणांमुळे रेंगाळले होते. २० कोटी रूपये खर्च करून हा पूल वाहतुकीस तयार झाला आहे. या पुलालगत असलेला डोंगर हटविल्‍यानंतर येथील रस्ता रूंदीकरण होणार आहे. त्‍यानंतर हा पूल वाहतुकीस खुला केला जाणार असल्‍याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते २०१४ मध्ये कोकणातील १० पुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम एकाचवेळी झाला होता. यात खारेपाटण पुलाचाही समावेश होता. २०१५ पर्यंत पुलाचे ३० टक्‍के कामही पूर्ण झाले. त्‍यानंतर पुलाचा मुख्य ठेकेदार दिवाळखोरीत गेला. यात पुलाचे काम केलेल्‍या उपठेकेदाराचेही पैसे बुडाले यामुळे हा सगळा वाद न्यायालयात पोचला होता. त्‍यानंतर २०१९ मध्ये महामार्ग विभागाने या पुलासाठी नव्याने निविदा मागविल्‍या. आता सर्व अडथळ्यांवर मात करून मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग हद्दीवरील हा पूल पूर्णत्‍वास गेला आहे.चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग हद्दीतील ९९.९५ टक्‍के काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले.

केवळ‍त खारेपाटण नदीवरील पूल, या पुलालगतची डोंगर कटाई तसेच कणकवली आणि कुडाळ हद्दीतील प्रत्‍येकी पाचशे मीटर रूंदीकरणाचे काम अपूर्ण आहे. ही कामे यंदा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून सिंधुदुर्ग हद्दीतील काम शंभर टक्‍के पूर्ण करण्याची कार्यवाही महामार्ग विभागाकडून केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटणच्या जुन्या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे; मात्र या पुलालगत अचानक वळण येत असल्‍याने वारंवार अपघात होत आहेत.

''खारेपाटण पुलालगत डोंगराचा भाग आहे. येथील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्‍याने डोंगर तोडण्याचे काम थांबले होते; मात्र आता येथील बाधित जमीन मालकांना नोटिसा दिल्‍या जात आहेत. लवकरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल. पावसाळ्यापूर्वी डोंगर कटाई करून दोन्ही पूल कार्यान्वित होतील.''

- देवीदास कुमावत, शाखा अभियंता महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT