कोकण

Konkan News: जुगार अड्ड्यावर छापा, तब्बल इतक्या रुपयांचा माल केला हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Guhagar News: तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील सांबसदाशिव बिल्डिंगमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी कारवाई केली आहे.

या अड्ड्यावर तब्बल ६४ हजार १५० रुपयांचा माल हस्तगत केला. सोमवारी रात्री ९.३० वाजता शृंगारतळीतील सांबसदाशिव बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत छापा टाकला.

त्या वेळी जुगार खेळत असताना शृंगारतळी येथील अभी वेल्हाळ, मंगेश शेटे (जानवळे), मंगेश सीताराम गांधी (मुंढर), प्रमोद दळी (पालपेणे), विश्वास बेलवलकर (शृंगारतळी) हे मिळून आले. या वेळी तब्बल ५१ हजार ८४० रुपये व इतर साहित्य मिळून ६४ हजार १५० रुपयांचा माल हस्तगत केला.

गुहागर पोलिसांनी जुगार खेळताना मिळून आलेल्या चौघांवर जुगार प्रतिबंधक कायदा ४ व ५ प्रमाणे पहाटे २ वाजता गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Crime News: कोळंबे परिसरातील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना ३० एप्रिलला सायंकाळी चार ते साडेसहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात कारणातून मुलीने आंब्याच्या कलमाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

मणक्याच्या त्रासाला कंटाळून घराच्या छताच्या लोखंडी बाराला नायलॉनची दोरी बांधून वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुरलीधर मुकुंद शिरधनकर (वय ६९, रा. नांदिवडे, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (ता. १) सकाळी पावणेनऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरधनकर यांना दोन महिन्यांपासून मणक्याचा त्रास होता. त्यामुळे ते कामही करू शकत नव्हते. आजाराला कंटाळून त्यांनी बुधवारी आत्महत्या केली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT